Maharashtra Assembly Election Mahim: माहिम मतदारसंघामधील मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे उमेदवार तसेच विद्यमान आमदार सदा सरवणकर यांनी आपण काहीही झालं तरी विधानसभा निवडणूक लढवणार असल्याचं जाहीर केलं आहे. महायुती आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये झालेल्या समझोत्यानुसार महिममधून शिंदेंचा पक्ष माघार घेत अमित ठाकरेंना पाठिंबा दिला जाईल अशी जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती. त्याच पार्श्वभूमीवर सरवणकर यांच्या शाखेबाहेर शनिवारी रात्री शेकडोंच्या संख्येने कार्यकर्ते जमायला सुरुवात झाली. निवडणुकीतून माघार न घेण्याची कार्यकर्त्यांनी मागणी केली. सदा सरवणकर यांनी माघार घेवून महायुतीचा पाठिंबा मनसेच्या अमित ठाकरेंना देण्याची चर्चा सुरू झाल्याने सरवणकर यांचे कार्यकर्ते आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. याच पार्श्वभूमीवर रात्री उशीरा त्यांनी शाखेच्या बाहेर जमलेल्या कार्यकर्त्यांशी संवाद साधला.


मिडियामध्ये उमेदवारी मागे घेणार अशाप्रकारच्या...


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जमलेल्या समर्थकांशी संवाद साधताना सदा सरवणकर यांनी, "आपण सर्वजण मोठ्या संख्येनं आलात त्याबद्दल मनापासून आभार व्यक्त करतोय. आपल्या येण्याचं कारणही मला कळलं आहे. मिडियामध्ये उमेदवारी मागे घेणार अशाप्रकारच्या बातम्या येत आहेत. मात्र या बातमीत किंचितही सत्यता नाही," असं म्हटलं. यानंतर समर्थकांनी घोषणाबाजी करत आपला पाठिंबा दर्शवला. 


आपण सर्वजण मागील अनेक वर्षांपासून...


सरवणकर यांनी पुढे बोलताना मुख्यमंत्री शिंदेंनी आपल्याला आशिर्वाद दिला असल्याचं म्हटलं. "राज्याचे मुख्यमंत्री आणि प्रमुख नेते एकनाथ शिंदेंनी आपल्याला पूर्ण आशिर्वाद दिलेला आहे. महायुतीच्या सर्वच नेत्यांनी आशिर्वाद दिलेला आहे. त्यांची इच्छा एकच आहे, माननिय शिवसेना प्रमुखांच्या विचाराचा उमेदवार हा इथे निवडून आला पाहिजे. आपण सर्वजण मागील अनेक वर्षांपासून शिवसेनाप्रमुखांचे आदेश पुढे घेऊन जात आहोत. एकनाथ शिंदेंही शिवसेनाप्रमुखांच्या विचार पुढे घेऊन जाण्याचं काम करत आहेत. म्हणून आपण निश्चिंत राहायला हरकत नाही," असं सरवणकर समर्थकांशी संवाद साधताना म्हणाले.


नक्की वाचा >> पुतण्याविरुद्ध लढणाऱ्या संदीप देशपांडेंना राज ठाकरेंचा 5 शब्दांचा खास मेसेज! म्हणाले 'वरळीतून तुला...'


जे जे शक्य आहे ते...


"मुख्यमंत्री शिंदेंवर आपला पूर्ण विश्वास आहे. त्यांनी एबी फॉर्म दिला. त्यांनी फॉर्म कधी भरायचं हे देखील सांगितलं. हे ही सांगितलं की वाटेल त्या परिस्थितीमध्ये दादार, माहीम, प्रभादेवीमधला आपला उमेदवार निवडून आलाच पाहिजे. त्यासाठी जे जे शक्य आहे ते सर्व करु. त्यांनी आशिर्वाद दिल्याने ज्या काही अफवा पसरवल्या जात आहेत त्यावर विश्वास ठेऊ नका. निश्चिंत होऊन घरी जा," असा सल्ला सरवणकर यांनी समर्थकांना दिला. 


तयारीला लागा...


तसेच भाषणाच्या शेवटी सरवणकर यांनी, "आपण सोमवारी सकाळी दहा वाजता उमेदवारी अर्ज भरण्यासाठी निघणार आहोत," असं सांगत तयारीला लागा असं म्हटलं.