Nashik Poitics: नाशिक जिल्ह्यात सध्या मनसेची आणि राष्ट्रवादी शरद पवार पक्षाची आयरामांवर मदार आहे. नाशिक शहरात मनसेने आणि शरद पवार पक्षाने दोघांनीही भाजपच्या पदाधिका-यांच्या गळ्यात माळ टाकून त्यांना उमेदवारी दिलीये.. त्यामुळे भाजपातील इच्छुकांची भाऊ गर्दी आणि वाढणारी नाराजी या दोन्ही पक्षांच्या पथ्यावर पडलीये.विधानसभा निवडणुकासाठी सर्वच राजकीय पक्षांनी उमेदवार जाहीर करणं सुरु केलंय.. नाशिक जिल्ह्यातही महायुती आणि मविआसह मनसेनं आपले काही उमेदवार जाहीर केलेत. तर मनसे आणि राष्ट्रवादी शरद पवार पक्षानं जिल्ह्यात आयारामांना संधी दिलीये.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नाशिक हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असलेला जिल्हा मानला जातो. मात्र राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर सर्वाधिक आमदार अजित पवारांसोबत गेलेत.. त्यामुळे विधानसभा निवडणुकीला राष्ट्रवादी शरद पवार पक्षानं आयारामांना संधी दिलीये.. नाशिक पूर्वमधून गणेश गीते यांना तर सिन्नरमधून उदय सांगळे यांना उमेदवारी देण्यात आलीये.


दुस-या बाजूला भाजपचे दिनकर पाटील यांनी राज ठाकरेंच्या उपस्थितीत मनसेत प्रवेश करत नाशिक पश्चिममधून उमेदवारीची माळ गळ्यात घातलीये.विशेष म्हणजे कधीकाळी नाशिक शहरात तीन आमदार असलेल्या मनसेनं आपल्या पक्षातील एकनिष्ठ मनसैनिकाला उमेदवारी जाहीर केलेली नाही. उलट मनसेची आयारामांवर नजर आहे.. त्यामुळे मनसेमध्ये सुद्धा नाराजीचे वारे वाहू लागलेत. नाशिक जिल्ह्यातील 15 मतदारसंघापैकी अनेक मतदारसंघामध्ये सर्वच राजकीय पक्षांनी उमेदवार दिल्याचं चित्र आहे..मात्र, मनसेनं उमेदवार जाहीर न केल्यानं नाशिक पश्चिमसोडून उर्वरित मतदारसंघात सुद्धा आयारामांना संधी देण्यात येणार का, याकडे सर्वांचं लक्ष लागलंय.


एकनाथ शिंदेंकडून सदा सरवणकरांना 24 तासांचा अल्टिमेटम


माहीम मतदारसंघावरुन महायुतीत गदारोळ सुरु असल्याचं चित्र आहे. मनसेकडून अमित ठाकरे  यांना माहीममधून उमेदवारी जाहीर झाल्यानंतर त्यांना पाठिंबा दिला जावा अशी महायुतीची भूमिका आहे. मात्र सदा सरवणकर  माघार घेण्यास इच्छुक नाहीत. सदा सरवणकर यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस  यांची वर्षा निवासस्थानी भेट घेतली. त्यामुळे महायुतीच्या नेत्यांमध्ये शिष्टाईचे प्रयत्न सुरू असल्याचं समजत आहे. यादरम्यान एक मोठी घडामोड समोर आली असून, एकनाथ शिंदे यांनी सदा सरवणकर यांना 24 तासांचा अल्टिमेटम दिला आहे. सदा सरवणकर यांना आपली यांना भूमिका ठरवण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 24 तासांची मुदत दिली आहे. नुकतीच सदा सरवणकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. महायुती माहीम विधानसभा मतदारसंघात मनसेचे उमेदवार अमित राज ठाकरेंना पाठिंबा देण्याच्या भूमिकेवर ठाम असल्याचं एकनाथ शिंदे यांनी सदा सरवणकर यांना सांगितलं आहे. राज ठाकरे यांनी लोकसभेला मदत केली होती. यापुढेही त्यांची मदत होईल असं एकनाथ शिंदे यांनी सदा सरवणकर यांना सांगितलं असल्याचं समजत आहे.