बारामतीत इंग्रजीवरून वादाचा पिक्चर सुरू झाला आहे. कारण अजित पवारांनी बारामती विधानसभेत इंग्रजीचा मुद्दा उपस्थित केला आहे. आणि त्यावरून आता वादाचा पिक्चर सुरू झाला आहे. पाहुयात बारामतीतील इंग्लिश विंग्लिश या खास रिपोर्टमधून. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बारामतीच्या प्रचारात नवनवे मुद्दे वापरले जाऊ लागले आहेत. अजित पवार आणि युगेंद्र पवारांत आता इंग्रजीवरून वादाचा नवा अंक सुरु झालाय. शरद पवारांनी बारामतीत उच्चशिक्षित उमेदवार दिल्याचा प्रचार सुरु केलाय. याला अजितदादांनी त्यांच्या शैलीत उत्तर दिलंय. मला इंग्रजी येवो किंवा न येवो पण मी राज्याचं साडे सहा लाख कोटींचं बजेट सादर करत असल्याचं सांगून दादांनी युगेंद्र पवारांवर निशाणा साधलाय.. युगेंद्र पवारांनी साडेसहा लाख कोटींचे आकडे अंकात लिहून दाखवण्याचं आव्हान दिलंय.


काका पुतण्याच्या वादात दुसरे पुतणे रोहित पवारांनीही उडी घेतलीय... बजेटमध्ये बेशिस्ती आलीये आहे. अजित पवारांनी त्याकडे लक्ष  द्यावं असा टोला रोहित पवारांनी लगावलाय.  राजकीय आरोप प्रत्यारोपांचा पवार कुटुंबियात कलगीतुरा रंगताना दिसतोय. एकमेकांवर टीका करण्यासाठी वेगवेगळे मुद्दे शोधले जातायेत. यावेळी एकमेकांवर टीकेसाठी इंग्रजीचा मुद्दा पुरेसा ठरलाय.