Ashok Pawar Son Video Case: महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वेगवेगळ्या ठिकाणी छापेमारीमध्ये रोख रक्कम सापडत असतानाच शिरुर मतदारसंघात अगदीच विचित्र प्रकार घडला आहे. शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार अशोक पवार यांच्या मुलाचं म्हणजेच ऋषीराज पवारचं अपहरण करुन एका महिलेबरोबर त्याचा अश्लील व्हिडीओ काढण्यात आला आहे. हे सारे कृत्य करणाऱ्यांकडून आता अशोक पवार यांना ब्लॅकमेल केलं जात आहे. 10 कोटी रुपये द्या नाहीतर तुमच्या मुलाचा व्हिडीओ लिक करुन अशी धमकी शरद पवारांच्या पक्षाच्या उमेदवाराला दिली जात आहे. वकील असीम सरोदे यांच्या कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती देण्यात आली. 


नेमका घटनाक्रम


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शनिवारी, 9 नोव्हेंबर रोजी आयोजित पत्रकार परिषदेत असीम सरोदे यांनी नेमका घटनाक्रम सांगितला आहे. ऋषीराज पवार हा वडील अशोक पवार यांचा प्रचारात व्यस्त असून याच दरम्यान त्याला त्यांच्याच एका सहकाऱ्यांने भेटण्याची इच्छा व्यक्त केली भाऊ कोलपे यांच्या सल्ल्यानुसार ऋषीराज या भेटीसाठी तयार झाला. कोलपेंबरोबर ऋषीराज मांडवगण फाट्याजवळीत गावात गेला. या ठिकाणी पोहचल्यानंतर कोलपे आणि इतर दोन व्यक्तींनी त्याला जबदस्तीने आधी एका रुममध्ये कोंडलं. त्यानंतर त्याला रस्सीने बांधून ताब्यात घेतलं. त्यानंतर ऋषीराजच्या अंगावरील कपडे काढण्यात आली. त्या ठिकाणी एका महिलेला बोलावून तिच्याकडून ऋषीराजसोबत अश्लील व्हिडीओ काढण्यात आले. ज्यावेळेस ऋषीराजने या साऱ्याला विरोध केला तेव्हा जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. या साऱ्या प्रकाराचे व्हिडीओ आणि फोटो काढण्यात आले. 


यामागील हेतू काय?


ऋषीराजने हे सारं करण्यामागील नेमका उद्देश काय अशी विचारणा केली असता आरोपींनी या फुटेजसाठी पुण्यातील एका व्यक्तीने आम्हाला 10 कोटी रुपये देण्याची तयारी दर्शवली आहे, असं सांगितलं. यानंतर ऋषीराजने या लोकांना मी तुम्हाला भऱपूर पैसे देईन असं सांगितलं. जवळच्याच गावात माझा मित्र राहतो. त्याच्याकडे रोख रक्कम असून आपण तिथेच जाऊ असं ऋषीराजने सांगितलं. या गावात गेल्यानंतर त्याने आरोपींची नजर चुकवून आपल्या मोबाईलवरुन मेसेजच्या माध्यमातून सहकाऱ्यांची मदत मागितली. काही वेळातच ऋषीराजचे सहकारी तिथे आले आणि त्यांनी कोलपेसहीत इतर दोघांना ताब्यात घेतलं. त्यांचे फोनही ऋषीराज समर्थकांनी ताब्यात घेतले. 


नक्की वाचा >> 'ही' भीती असल्याने CM शिंदेंनी राज ठाकरेंच्या लेकाविरुद्ध उमेदवार दिला; राऊतांचा दावा


गुन्हा दाखल


या प्रकरणामध्ये ऋषीराजच्या तक्रारीच्या आधारे शिरुर पोलीस स्टेशनमध्ये कोलपेबरोबरच अन्य दोन व्यक्ती आणि महिलेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलीस निरिक्षक हनमंत गिरी करथ आहेत. 


अशोक पवार काय म्हणाले?


अशोक पवार यांनी या घटनेबद्दल संताप व्यक्त केला आहे. "माझा मुलगा ऋषीराजबरोबर जे काही घडलं ते संतापजनक आहे. या घटनेमुळे माझ्या मानवर परिणाम झाला आहे. निवडणूक लढताना ती लोकशाही मार्गाने लढली पाहिजे. घरातील सदस्यांना धमकावून आणि ब्लॅकमेल करुन ती लढता कामा नये. हा केवळ माझ्यावर नसून माझ्या संपूर्ण कुटुंबावर केलेला हल्ला आहे. पोलिसांनी या प्रकरणाची सखोर चौकशी करुन यामागील मास्टरमाईंडला अटक करावी," अशी मागणी अशोक पवार यांनी केली आहे.