Pratibha Dhanorkar Controversial Speech: विधानसभा निवडणुकीच्या मतदानाला काही तास शिल्लक आहेत आणि प्रचाराच्या तोफा थंडावल्या आहेत. राजकीय आरोप-प्रत्यारोप, घोषणा, आश्वासने थांबले आहे. 20 नोव्हेंबरला सर्व उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत कैद होणार आहे. असे असले तरी सोशल मीडियाच्या जमान्यात वादग्रस्त विधानांचे व्हिडीओ उमेदवार, पक्षांची पाठ सोडत नाहीत. असाच एक व्हिडीओ सध्या चर्चेत आलाय. ज्यामध्ये काँग्रेसच्या खासदार प्रतिभा धानोरकर वादग्रस्त विधान करताना दिसत आहेत. ते प्रचारसभेतील भाषणात मतदारांना इशारा देताना दिसत आहेत. वरोरा विधानसभा मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार प्रवीण काकडे यांच्या प्रचारार्थ भाषण करताना धानोरकरांनी केलेले भाषण वादात सापडण्याची शक्यता आहे.


काय म्हणाल्या प्रतिभा धानोरकर?



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आज काही लोक अपक्षाच्या पाठीमागे गाडी घेऊन खुलेआम फिरत आहेत. समाजाची खासदार म्हणून मी खासदार आहेत. आज  पण 5 वर्षे खासदार आहे. माझा विरोध करणाऱ्या प्रत्येकाचा लेखाजोखा या माझ्याकडे आहे, असा धमकीवजा इशारा प्रतिभा धानोरकर यांनी दिला आहे. खासदार धानोरकर या कुणबी समाजाच्या मतांच्या बळावर लोकसभा निवडणुकीत विजयी झाल्याचे म्हंटले जाते. 'आज जे लोक माझा विरोध करतायत, माझ्या विरोधात बोलतायत, त्यातील कोणालाच मी आता काही बोलणार नाही. पण त्यांनी लक्षात घ्यावे की, लोकसभा क्षेत्रात 2800 गावे आहेत. या गावांतील कोण कार्यकर्ता माझ्या बाजूने होता? कोण विरोधात होता? प्रत्येकाचा आढावा आजही माझ्याजवळ असल्याचे विधान त्यांनी केले. 


ही तर एक विधानसभा असून फक्त 300 गावांची आहे. या विधानसभेतील गावनिहाय, घरनिहाय कुणी विरोध केला आणि कोण बाजूने होता याचा चिठ्ठा काढण्यास फार वेळ लागणार नसल्याचे त्या म्हणाल्या. 20 नोव्हेंबरला मतदान झाले की गावनिहाय यादी माझ्याकडे येणार आहे. त्यामुळे कोणाला कसे ठेवायचे आणि कुणाला बारीक करायचे याचा सर्व विचार मी करणार असल्याचा इशारा त्यांनी दिला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल होत असून. या विधानामुळे त्यांच्यावर नेटीझन्सकडून टिका होत आहे.