Ramdas Athawale Warning Meaning To Eknath Shinde Party: केंद्रीय मंत्री तसेच रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे प्रमुख नेते रामदास आठवलेंनी महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण होणार याबद्दल निर्णय झाल्याचा दावा केला आहे. भारतीय जनता पार्टीच्या केंद्रीय नेतृत्वाने विद्यमान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं नाव मुख्यमंत्री म्हणून निश्चित केल्याचं आठवलेंनी 'झी 24 तास'ला दिलेल्या विशेष मुलाखतीत सांगितलं आहे. तसेच फडणवीसांना मुख्यमंत्री करणं विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या पक्षाला मान्य नसेल तर काय? या प्रश्नावरही आठवलेंनी स्पष्टपणे भूमिका मांडत शिंदेंच्या पक्षाला सूचक इशारा दिला आहे. (दिवसभरातील घडामोडींचे LIVE UPDATES पाहाण्यासाठी येथे क्लिक करा.)


अजित पवारांचा फडणवीसांना मुख्यमंत्री करण्यास पाठिंबा असल्याचा दावा


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

"महायुतीला एवढं मोठं बहुमत मिळालं आहे तरी मुख्यमंत्री कोण हे निश्चित झालेलं नाही," असा प्रश्न रामदास आठवलेंना विचारला गेला. त्यावर आठवलेंनी, "मुख्यमंत्री कोण हे ठरलं आहे. हायकमांडने देवेंद्र फडणवीसांचं नाव निश्चित केलं असून देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होणार आहेत," असं उत्तर दिलं.


पुढे बोलताना आठवलेंना, "एकनाथ शिंदे आणि अजित पवारांचे नेते दावे करत आहेत की आमचे नेते मुख्यमंत्री झाले पाहिजेत. तसेच एकनाथ शिंदेंनीच मुख्यमंत्री राहिलं पाहिजे असंही म्हटलं जात आहे," असं विचारण्यात आलं. त्यावर आठवलेंनी, "मला वाटतं की अजित पवारांचं असं काही म्हणणं नाही आहे. त्यांनी तर देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री करण्याच्या निर्णयाला पाठिंबा देण्याची भूमिका घेतली आहे, असं आठवले म्हणाले.


नक्की वाचा >> राजकीय घडामोडींना वेग! रात्री 12.53 AM ला CM शिंदेंची पोस्ट; म्हणाले, 'अशा पद्धतीने माझ्या...'


'भाजपा अजिबात तयार नाही; फडणवीस चार पावलं...'


तसेच पुढे बोलताना, "एकनाथ शिंदेंचं म्हणणं आहे की त्यांना अजून काही काळ दिला जावा. मात्र भाजपा त्यासाठी अजिबात तयार नाहीये. एकनाथ शिंदेंना अडीच वर्ष मिळाले आहेत. फडणवीस त्यासाठी चार पावलं मागे आले. तर मला वाटतं की आता शिंदेंनी समजून घेण्याची गरज आहे. देवेंद्र फडणवीसांनाच मुख्यमंत्री बनवलं पाहिजे," असं आठवले म्हणाले.


नक्की वाचा >> निवडणुकीनंतरचा राज्यातील सर्वात मोठा निर्णय! गृह खात्याने...; फडणवीसांची 'ती' भेट कारणीभूत


शिंदे फडणवीसांना मुख्यमंत्री करायला तयार होतील?


आठवलेंच्या या विधानानंतर त्यांना, "एकनाथ शिंदे फडणवीसांना मुख्यमंत्री करण्यासाठी तयार होतील का?" असा सवाल विचारण्यात आला. त्यावर त्यांनी, "ते मान्य करतील. नाही केलं तरी आमच्याकडे बहुमत आहे. त्यांनी नाही ऐकलं तरी चालले कारण आमच्याकडे बहुमत आहे. पण महाराष्ट्रात असं होणं योग्य नाही. महाराष्ट्रात महायुती भक्कम आहे. एकत्र राहणं फार गरजेचं आहे. म्हणून शिंदेंना ऐकावेच लागेल," असं म्हणत शिंदेंच्या पक्षाला सूचक शब्दांमध्ये इशारा दिला आहे.