Raosaheb Danve on Shivsena: उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे नेते रावसाहेब दानवे यांनी 'झी 24 तास'च्या जाहीर सभेत उपस्थिती लावली. शिवसेनेत झालेली फाटाफूट, ईडी सीबीआयची भीती, विरोधी पक्षातून ऑफर अशा विविध प्रश्नांना दिलखुलास उत्तरे दिली. 


मागच्या अडीच वर्षाचा काळ कसा होता? 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अडीच वर्षांचा काळ वेदनादायी, संघर्षमय होता. एका ताटात जेवणाऱ्या माणसांनी असं केलं. वेदना होताना संघर्ष झाला. उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात काम करायच हा बाळासाहेबांचा आदेश आहे. आता जनमत आमच्या बाजूने आहे. आताचं आव्हान किंवा भविष्यात काही आव्हानं आलं तरी आम्ही सहज पार करु असे ते म्हणाले.  


दानवेंना कधी पक्षातून फुटण्यासाठी ऑफर आली का?


जो फुटू शकतो त्यासाठी प्रयत्न होतात. जो फुटू शकत नाही, त्यासाठी प्रयत्न होत नाहीत. पद येतात, पद जातात. आपण पदामागे धावू नये. त्यामुळे पक्ष सोडण्याचा विचार नसल्याचे त्यांनी सांगितले. खासदारकीच तिकीट मिळायला हवं होतं अशी कार्यकरत्यांची इच्छा असते. पण इच्छेला मुरड घालता आलं पाहिजे. लोकसभेला माझी इच्छा होती. पण मी मुरड घातली. प्रत्येक कार्यकर्त्यांनी असं वागलं पाहिजे. 


खळखट्याक ते संयमी प्रवास?


बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वात कोणी पक्ष सोडताना विचार करायचे. पक्ष सोडलेल्यांना शिवसैनिकांच्या रोषाचा सामना करावा लागायचा. आधीची शिवसेना खळखट्याक म्हणून ओळखली जायची. पण उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात 40 आमदार पक्ष सोडून गेले. उद्धव ठाकरेंची शिवसेना संयमी होत चालली आहे का? याबद्दल अंबादास दानवेंनी उत्तर दिलंय. वेळ काळानुरुप वागाव लागतं.  खळखट्याक करण्याला आमचा विरोध नाही. वेळ आल्यावर तेदेखील करावे लागते. पण खळखट्याक करुन एखाद्याला संपवण्यापेक्षा प्रचार, मतदानातून एखाद्याचा राजकीय अंत करु शकतो, असे उत्तर त्यांनी दिले. 


ईडी-सीबीआयची भीती नाही वाटत का?


मी माझ्या वडीलांच्या घरात राहतो. मी 30 सेकंदात झोपतो. माझ्याकडे फॅक्टरी वैगरे नाहीत. माझी छोटी शेती आहे. त्यांना वाटत असेल तर ईडी सीबीआयने माझ्याकडे यावं.ईडी-सीबीआयची भीती मला कधी वाटत नाही, असे ते सांगतात. 


तर 2 लाख तरुणांना  नोकरी मिळाली असती 


नागपूरला होणारा टाटा एअर बसला प्रकल्प गुजरातला गेला. 2-3 वेळा सरकार दाओसला गेले पण त्यांनी नक्की काय झालंय, हे समोर येऊन सांगावं. चार मोठे प्रकल्प गुजरातला गेले. ते गेले नसते तरी साधारण 2 लाख तरुणांना नोकरी मिळाली असती, असे दानवे यांनी यावेळी सांगितले.