मुंबई : महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीचा निकाल गुरूवारी 24 ऑक्टोबर रोजी झाला. निकालात कोणत्याही पक्षाला बहुमत मिळालेले नाही पण महायुतीची आकडेवारी बहुमताची आहे. तसेच काँग्रेस-राष्ट्रवादीने देखील शंभरचा आकडा पार केला आहे. 110 जागांपैकी फक्त एकाच जागेवर मनसेला विजय मिळाला आहे. 2014 पेक्षा 2019 चा निवडणुक निकाल हा धक्कादायक होता. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भाजपच्या 'महाजनादेश' यात्रेकरता पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपा अध्यक्ष अमित शाह महाराष्ट्रात दाखल झाले होते. भाजपच्या बड्या उमेदवारांकरता त्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी सभा देखील घेतल्या. पण त्या सभांची फार मदत झाली असं म्हणता येणार नाही. या सर्व पार्श्वभूमीवर नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. 


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रतिक्रिया 



महाराष्ट्र आणि हरयाणातील भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांनी पुन्हा एकदा जनतेचा आशीर्वाद प्राप्त केला आहे. त्यामुळे मी त्यांचे अभिनंदन करतो. दोन्ही राज्यांमध्ये गेल्या पाच वर्षांमध्ये चांगली कामे केला आणि त्या चोरावर आज पुन्हा सत्तेत येण्याची किमया साधली. 


 भाजपाध्यक्ष अमित शाह यांची प्रतिक्रिया 




महाराष्ट्र आणि हरयाणा या दोन्ही राज्यातील जनतेचे मी आभार मानतो. जनतेची सेवा आम्ही केली तशीच यापुढे देखील आम्ही करणार आहोत. भाजप- शिवसेना युतीवर पुन्हा एकदा विश्वास व्यक्त करणाऱ्या जनतेचे आभार ! 


अमित शाह यांच्यावर दोन्ही राज्यांतील सरकार स्थापनेची जबाबदारी आहे.  दिल्लीत भाजपाच्या संसदीय समितीच्या  बैठकीत निर्णय घेतला जाणार आहे. या बैठकीत दोन्ही राज्यांतील निवडणुकीच्या निकालांवरही चर्चा होणार आहे.