सदाभाऊ खोत यांच्याकडून शरद पवारांचा एकेरी उल्लेख; म्हणाले `महाराष्ट्राचा चेहरा तुझ्यासारखा...`
Sadabhau Khot on Sharad Pawar: शरद पवारांवर (Sharad Pawar) बोलताना आमदार सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांची जीभ घसरली आहे. महाराष्ट्राचा चेहरा तुझ्यासारखा करायचा आहे का ? असा एकेरी उल्लेख करत त्यांनी टीका केली. सदाभाऊ खोत यांच्या टीकेमुळे मोठा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.
Sadabhau Khot on Sharad Pawar: विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने सध्या प्रचारसभांचा धुरळा उडत असताना आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झाडल्या जात आहेत. यादरम्यान नेतेमंडळी एकमेकांवर जोरदार टीका करत आहे. या टीका करताना काही ठिकाणी पातळी घसरत आहे. त्यातच शरद पवारांवर (Sharad Pawar) बोलताना आमदार सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांची जीभ घसरली आहे. महाराष्ट्राचा चेहरा तुझ्यासारखा करायचा आहे का ? असा एकेरी उल्लेख करत त्यांनी टीका केली. सदाभाऊ खोत यांच्या टीकेमुळे मोठा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. राज्याची तिजोरी ही गाय आहे. ती गाय शरद पवार, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि काँग्रेसला पाहिजे अशी टीकाही त्यांनी केली आहे.
सदाभाऊ खोत नेमकं काय म्हणाले?
“अरे पवार साहेब, तुमच्या चिल्यापिल्याने कारखाने हाणले, बँका हाणल्या, सुतगिरण्या हाणल्या, पण पवारांना मानावं लागेल, एवढं घडलं तरी सुद्धा भाषणात म्हणतं, मला महाराष्ट्र बदलायचा आहे, मला महाराष्ट्राचा चेहरा बदलायचा आहे. कसला तुझा चेहरा? तुझ्या चेहऱ्यासारखा पाहिजे का? तुला कसला चेहरा पाहिजे?”, अशी टीका सदाभाऊ खोत यांनी केली आहे.
EXCLUSIVE: अजित पवारांनी शरद पवारांना अध्यक्षपदावरुन हटवलं होतं, सुप्रिया सुळेंचा खळबळजक दावा
राज्याची तिजोरी ही गाय आहे. ती गाय शरद पवार, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि काँग्रेसला पाहिजे असंही सदाभाऊ खोत म्हणाले आहेत. "शरद पवार, उद्धव ठाकरे आणि काँग्रेसवाले यांनी देवेंद्र फडणवीस यांना का घेरलं आहे माहिती आहे का? तर ते काय म्हणत होते साहेबाला, गायीची जी कास आहे त्या कासेला चार थानं असतात. या अर्धं थान वासराला पाजायचं म्हणजे आपल्याला, आणि साडेतीन थानातलं दूध आपणच हाणायचं. देवेंद्र फडणवीसांनी मी सगळं दूध वासरालाच देणार असं सांगितलं. मग शरद पवार साहेबांना नऊवा महिना लागला आणि कळा सुटल्या”, अशी खोचक टीका सदाभाऊ खोत यांनी केली.
यावेळी त्यांनी उद्धव ठाकरेंवरही टीका केली. "उद्धव ठाकरे म्हणतात एक जॅकेटवालं, एक दाढीवालं. पण तुम्हीच दाढ्या कुरवाळत बसलात. अडीच वर्षं तुम्ही घराबाहेर पडला नाहीत. शेतकऱ्याचा भाजीपाला सजला, दूध रस्त्यावर सांडलं तरी तुम्ही शेतकऱ्याला एका रुपयाचीही मदत केली नाही. त्यामुळे तुम्हाला मत मांडण्याचा अधिकार नाही," अशी टीका सदाभाऊ खोत यांनी केली.