Maharashtra Assembly Election Sharad Pawar:  उपमुख्यमंत्री अजित पवारांनी रविवारी बारामतीमधील ढाकाळेमधील गावातील ग्रामस्थांनी संवाद साधताना राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक शरद पवारांबद्दल एक विधान केलं होतं. या विधानामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. राजकीय वर्तुळामध्ये या विधानावरुन उलट सुलट चर्चा सुरु असतानाच आता थेट शरद पवारांनी 'झी 24 तास'च्या 'टू द पाँईट' मुलाखतीमध्ये या विधानावर भाष्य केलं आहे. 'आम्ही साहेबांना सोडलं नाही' असं म्हणणाऱ्या अजित पवार आणि त्यांच्या पक्षातील आमदारांना शरद पवारांनी मोजक्या शब्दांमध्ये सुनावलं आहे.


अजित पवार काय म्हणाले होते?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अजित पवारांनी अगदी 1991 साली आमदार झाल्यापासून केलेल्या कामांचा पाढा वाचून दाखवला. अजित पवारांनी अगदी सिंचनापासून ते रस्त्यांचं बांधकाम आणि किती निधी बारामतीसाठी आणला वगैरे बऱ्याच मुद्द्यांना आपल्या भाषणामध्ये हात घातला. "घरातून दोन उमेदवार असल्याने तुमची पंचायत झाली आहे. मी पण कामाचा माणूस आणि साहेब ही दैवत असं झालं. लोकसभेला साहेबांना मतदान दिलं. आता मला विधानसभेला मत द्या," असं आवाहन अजित पवारांनी गावकऱ्यांना केलं. 


आपल्या भाषणामध्ये अजित पवारांनी महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये सुरुवातीला सत्तेत असताना "कोरोनात अडीच वर्षे तिथे वाया गेली," असंही  म्हटलं. त्यानंतर अजित पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पडलेल्या फुटीबद्दल विधान केलं. "तुम्हाला वाटत असेल या वयात अजित पवारांनी साहेबांना सोडायला नको होतं. मी साहेबांना सोडलेलं नाही. सगळ्याच आमदारांचे मत होतं सगळ्यांच्या सह्या होत्या," असं सूचक विधान अजित पवारांनी आपल्या भाषणामध्ये केलं. अजित पवारांच्या या विधानाने राज्यामध्ये नवीन चर्चांना उधाण आल्याचं पाहायला मिळालं.


नक्की वाचा >> राज ठाकरेंच्या 'फडणवीस मुख्यमंत्री होणार' विधानावर शिंदे पहिल्यांदाच बोलले! 4 शब्दांत उत्तर


शरद पवारांनी 'साहेबांना सोडलेलं नाही'वर काय म्हटलं?


अजित पवारांनी केलेल्या या विधानाच्या पार्श्वभूमीवर शरद पवारांनी 'झी 24 तास'ला 'टू द पाँईट' कार्यक्रमात दिलेल्या मुलाखतीत प्रश्न विचारण्यात आला. ‘आम्ही साहेबांना सोडलं नाही’ असं अनेकांचं म्हणणं आहे, असं म्हणत शरद पवारांचं यावर मत जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी अगदी मोजक्या शब्दांमध्ये उत्तर दिलं. "ज्यांच्याविरोधात लढले त्या भाजपसोबत गेले. मग सोडलं कसं नाही?" असा सवाल शरद पवारांनी 'साहेबांना सोडलं नाही' म्हणणाऱ्या अजित पवारांना विचारला आहे. "सोडलं नाही म्हणणाऱ्यांनी पाच ते सहा वेळा निवडणुका लढवल्या आहेत. ते निवडणूक कोणाविरोधात लढले होते? भाजपाविरोधात, आज बसले कोणाबरोबर आहेत? भाजपाबरोबर. त्यांना लोकांना सांगायला काहीतरी हवं आहे म्हणून सांगत आहेत, बाकी काही नाही," असं शरद पवारांनी उत्तर देताना म्हटलं.