Sanjay Shirsat on Eknath Shinde: राज्यात महायुतीला बहुमत मिळालेलं असतानाही अद्याप सरकार स्थापन झालेलं नाही. त्यात मुख्यमंत्रीपदी कोण होणार? याबाबत अधिकृत घोषणा झालेली नाही. दिल्लीत गुरुवारी रात्री राज्यातील नवं सरकार, मंत्रिमंडळ आणि मुख्यमंत्री यावर यासंदर्भात खलबतं झाली. मात्र त्यानंतरही अधिकृतपणे काही माहिती देण्यात आलेली नाही. दरम्यान एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी आधीच मुख्यमंत्रिपदावरचा दावा सोडला असून, त्यांना उपमुख्यमंत्रीपद दिलं जाईल अशी चर्चा आहे. त्यातच आता शिवसेना नेते संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी मोठं विधान केलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्रीपद स्विकारणार नाहीत असा अंदाज संजय शिरसाट यांनी व्यक्त केल आहे. तसंच एकनाथ शिंदे महाराष्ट्राच्याच राजकारणात राहतील असंही म्हटलं आहे. ते म्हणाले की, "एकनाथ शिंदे महाराष्ट्राच्याच राजकारणात राहतील असं वाटतं. कदाचित उपमुख्यमंत्रिपद स्विकारणार नाहीत असा माझा अंदाज आहे. ही फार मोठी गोष्ट असू शकते." 


दिल्लीतील बैठकीत गाजलेले पाच मुद्दे 


- मुख्यमंत्री भाजपचा. मुख्यमंत्रीपदासाठी फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब प्रतीक्षेत 
- एकनाथ शिंदेंकडून महत्वाच्या खात्यांची मागणी 
- बैठकीत अजित पवारांच्या मागण्यांवरही चर्चा
- गृह, अर्थ, नगरविकास, महसूल अशा महत्त्वाच्या खात्यांवर चर्चा झाल्याची माहिती
- शिंदे दादांच्या वाटेला काय येणार याबद्दल उत्सुकता कायम 


एकनाथ शिंदे बैठकीनंतर काय म्हणाले?


"बैठक उत्तम आणि सकारात्मक झाली. ही पहिली बैठक होती. आम्ही शाह आणि जे. पी. नड्डांशी चर्चा केली. महायुतीची अजून एक बैठक होणार आहे. या बैठकीमध्ये मुख्यमंत्री कोण होणार हे ठरवलं जाईल. ही बैठक मुंबईमध्ये होणार आहे," अशी माहिती एकनाथ शिंदेंनी दिल्लीत बैठकीनंतर दिली. 


"कालच्या पत्रकार परिषदेत मी माझी भूमिका स्पष्ट केली आहे. मुख्यमंत्री पदासंदर्भात महायुतीत कोणताही गोंधळ नाहीये. हा लाडका भाऊ दिल्लीत चर्चेसाठी आला असून लाडका भाऊ ही ओळख कोणत्याही पदापेक्षा मोठी वाटते," असं एकनाथ शिंदेंनी म्हटलं आहे.


संजय शिरसाट यांचा प्रवास - 


पहिल्यांदा 2000 साली नगरसेवक 


पुढे 2001 मनपा सभागृहनेता झाले
 
2009 साली पहिल्यांदा संभाजीनगर (पश्चिम) मतदारसंघातून आमदार


2014 साली दुसऱ्यांदा संभाजीनगर (पश्चिम) मतदारसंघातून आमदार


2019 साली तिसऱ्यांदा संभाजीनगर (पश्चिम) मतदारसंघातून आमदार


2014 साली महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ अध्यक्ष


2024 साली चौथ्यांदा संभाजीनगर (पश्चिम) मतदारसंघातून आमदार