Maharashtra Assembly Election: कोण आहे रे तो? उद्धव ठाकरे मुंबई पोलिसांवरच संतापले; सभास्थळी एकच गोंधळ
Uddhav Thackeray Gets Angry on Mumbai Police: महाविकास आघाडीची (Mahavikas Aghadi) संयुक्त सभा आज बीकेसीमध्ये पार पडली. या सभेसाठी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) पोहोचले असता गेटवर मुंबई पोलिसांवर (Mumbai Police) चांगलेच संतापलेले पाहायला मिळालं.
Uddhav Thackeray Gets Angry on Mumbai Police: महाविकास आघाडीची (Mahavikas Aghadi) संयुक्त सभा आज मुंबईतील बीकेसीमध्ये पार पडली. या सभेत महाविकास आघाडीने आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला. या सभेसाठी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे, राहुल गांधी, उद्धव ठाकरे, शरद पवार, नाना पटोले, सुप्रिया सुळे यांच्यासह अनके ज्येष्ठ नेते उपस्थित होते. दरम्यान उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) सभास्थळी दाखल झाले तेव्हा मुंबई पोलिसांवर चांगलेच संतापले. यामुळे गेटवर काही काळासाठी गोंधळाची स्थिती निर्माण झाली होती.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे बीकेसी येथील सभास्थळी दाखल झाल्यानंतर प्रवेशद्वारावर त्यांच्या सुरक्षारक्षकांना पोलिसांनी अडवलं. यानंतर उद्धव ठाकरे चांगलेच संतापलेले पाहायला मिळालं. यावेळी उद्धव ठाकरे मुंबई पोलिसांवर भडकले आणि आपला संताप व्यक्त केला. कोण आहे रे तो? यांची नावं लिहून घ्या असंही त्यांनी यावेळी सांगितलं. आदित्य ठाकरेही यादरम्यान घडल्या प्रकारामुळे नाराज दिसत होते. उपस्थितांनी यावेळी परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला.
उद्धव ठाकरेंनी यावेळी भाषणादरम्यान महायुतीवर जोरदार टीका केली. आपल्याकडे अॅटम बॉम्ब असून पलीकडे फुसके आहेत. 23 तारखेला विजयाचे फटाके फोडायचे आहेत. महागाईने फराळाचे अनेक पदार्थ गायब झाले आहेत. आनंदाच्या शिध्यात उंदाराच्या लेंड्या मिळत आहेत अशी टीका त्यांनी केली. तसंच पाच जीवनावश्यक वस्तुंचे दर स्थिर ठेवू असं आश्वासन दिलं.
हवेतल्या गोष्टी आम्ही बोलत नाही. मुलांना आम्ही मोफत शिक्षण देणार आहोत. बेरोजगार तरूणांना दर महिन्याला ४ हजार रूपये देणार आहोत असंही त्यांनी सांगितलं. मुंबईतल्या २० जागा अदानींच्या घशात घातल्या जात आहेत. आमचे सरकार आल्यावर धारावीचे कंत्राट रद्द करू व तिथल्या तिथे घरे व उद्योगांना जागा देवू असंही आश्वासन त्यांनी दिलं.
करोना काळात धारावी वाचवली होती,आताही धारावी वाचवणार. कोळीवाडेही त्यांच्या घशात घालू देणार नाही. कोळीवाड्यांच्या मतानुसार त्यांचा विकास करू. मुंबई व महाराष्ट्राचे गुजरातीकरण रोखण्यासाठी आमची लढाई आहे असा हल्लाबोल त्यांनी केला.
दरम्यान महाविकास आघाडीने आपल्या जाहीरनाम्यात पाच गॅरंटी दिल्या आहेत.
• शेतकऱ्यांना 3 लाख रुपयांपर्यंतचे कर्जमाफ तसेच नियमित कर्जफेडीसाठी 50 हजार रुपयांचे प्रोत्साहन.