Maharashtra Assembly Elections 2024 : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ प्रचारसभेत हिंदूंच्या मतांसाठी बटेंगे,कटेंगेची घोषणा दिली. योगींच्या या घोषणेनंतर महाराष्ट्राचं राजकारण तापलंय.  भाजपच्या या भूमिकेचा विरोध अजितदादांनी ठामपणे करत मुस्लिम मतदारांना राष्ट्रवादीच्या उमेदवारांना मतदान  आवाहन केले आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बटेंगे तो कटेंगे'वरून मुस्लिमांची मतं न मिळण्याचा धोका असल्यानं अजित पवारांनी बटेंगे,कटेंगेच्याविरोधात ठाम भूमिका घेतलीय. जागावाटपात राष्ट्रवादीला 60 जागा मिळाल्या असल्या तरीही आम्ही मुस्लिमांना दहा जागा दिल्याचं अजित पवारांनी सांगितलंय. तसेच विधान परिषदेतही मुस्लिम समाजाला संधी दिल्याचा सांगत त्यांनी बटेंगे,केटेंगेला आपला विरोधक कायम ठेवलाय. 


राष्ट्रवादीनं उमेदवारीत अल्पसंख्याकांना स्थान दिलंय. शिवाय अल्पसंख्याकांसाठी अनेक योजना राबवल्याचा दावा अजितदादांनी केलाय.  काँग्रेसला सोशल इंजिनिअरिंग जमलं नाही ते मी करून दाखवलं असं म्हणत अजित पवारांनी राष्ट्रवादीच्या उमेदवारांना मतदान करण्याचं आवाहन मुस्लिमांना केलंय. अजित पवारांचा बटेंगे,कटेंगेला विरोध होता तर ते महायुतीतून बाहेर का? पडले नाहीत,असा सवाल काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी विचारलाय.


बटेंगे,कटेंगेवरून महायुतीतही मतभेद आहेत. भाजपच्या या भूमिकेला विरोधकांसोबतच स्वकीयही विरोध करतायेत. विरोध करणाऱ्यांना फडणवीसांनी खडे बोल सुनावलेत. शिवाय अजित पवारांना ही भूमिका समजावून सांगणार असल्याचंही फडणवीसांनी सांगितलंय. मात्र,दादांना मोठ्या प्रमाणात मुस्लिम मतदान करतात. त्यामुळेच मतांसाठी दादांनी मुस्लिमांना आर्जव करण्यास सुरूवात केलीय.


पंकजा मुंडेंनी बटेंग तो कटेंग वरून मोठं वक्तव्य केलंय. बटेंगे तो कटेंगेची महाराष्ट्रात गरज नाही असं पंकजा मुंडे म्हणाल्यात.. एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत पंकजा मुंडेंनी असा दावा केल्याचं म्हटलंय..  योगी  आदित्यनाथ यांनी राज्यात झालेल्या एका सभेत बटेंगे त कटेंगेचा नारा दिला होता.. मात्र त्यांच्या यना नाऱ्याला भाजपमधूनच विरोध होत असल्याचं दिसतंय