Maharashtra Assembly Elections 2024 :   महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकांचे बिगुल वाजले आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने (Election Commission Of India Press Conference) महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर केल्यात. महाराष्ट्रात 20 नोव्हेंबरला मतदान तर 23 नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे. भाजपने 99 उमेदवारांची पहिली याची जाहीर केली. यानंतर आता  शिंदेच्या शिवसेना पक्षाने 45 उमेदवारांची यादी जाहीर केली आहे.  शिंदेच्या शिवसेना पक्षाच्या पहिल्या यादीत पहिलेच नाव एकनाथ शिंदे यांचे आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दरम्यान, आणखी एक ठाकरे निवडणुकीच्या मैदानात उतरलेयत. मनसेचे युवा नेते अमित ठाकरे विधानसभा निवडणूक लढवणार आहेत. माहिममधून त्यांना पक्षाकडून उमेदवारी जाहीर झालीय.  अमित ठाकरे विरोधात शिंदेंच्या शिवसेनेचे सदा सरवणकर हे निवडणूक लढणार आहेत. उदय सामंत यांच्या बंधू किरण सामंत यांना देखील उमेदवारी देण्यात आली आहे. 


शिंदेंच्या शिवसेनेची पहिली उमेदवार यादी 


एकनाथ शिंदे - कोपची पाचपाखाडी 
साक्री - मंजुळा गावीत
चोपडा - चंद्रकांत सोनवणे 
जळगाव ग्रामीण - गुलाबराव पाटील 
पाचोरा - किशोर पाटील 
एरंडोल - अमोल पाटील 
मुक्ताईनगर - चंद्रकांत पाटील 
बुलढाणा - संजय गायकवाड 
मेहकर - संजय रायमुलकर 
दर्यापूर - अभिजीत अडसूळ


माहिममधून सदा सरवणकर यांना तिकिट देण्यात आले आहे. 


राजापूर - किरण सामंत , उदय सामंत यांच्या बंघूंना संधी


पैठण - खासदार संदिपन भुमरे यांच्या मुलाला विलास भुमरे यांना तिकिट 


एंरडोल - माजी आमदार चिमणराव पाटील यांचे सुपुत्र अमोल पाटील