Maharashtra Assembly Elections 2024 : मुंबई महापालिकेतील काँग्रेसचे रवी राजा भाजपच्या छावणीत दाखल झालेत. सायन कोळीवाडा मतदारसंघातून ते विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक होते. पण  उमेदवारी न मिळाल्यानं संतापलेल्य़ा रवी राजांनी भाजपची वाट धरली. वर्षानुवर्षं वेगवेगळी पदं भोगणाऱ्या रवी राजांनी उमेदवारीसाठी पक्षाला सोडचिठ्ठी दिल्यानं काँग्रेसमध्ये संतापाची भावना आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबई महापालिकेतील माजी विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी काँग्रेसचा हात सोडून भाजपचं कमळ हातात घेतलंय. सायन कोळीवाडा विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी न मिळाल्यानं नाराज रवी राजांनी काँग्रेसला रामराम केलाय. काँग्रेसचा आक्रमक चेहरा अशी त्यांची ओळख होती.


रवी राजा यांच्या अनुभवाचा भाजपला भविष्यात मोठा फायदा होईल असा आशावाद उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलाय.रवी राजा यांना पक्षानं अनेक पदं दिली. वर्षानुवर्षं सत्तापदं भोगूनही त्यांनी आमदारकीसाठी पक्ष सोडल्याचा आरोप खासदार वर्षा गायकवाड यांनी केलाय. कायम सत्तापदं हवीत ती मिळाली नाहीत की पक्षाला लगेच सोडचिठ्ठी देण्याची नवी संस्कृती दृढ होत चाललीय. रवी राजाही त्याला अपवाद ठरले नाहीत. आता रवी राजा भाजपमध्ये किती दिवस नांदतील हे पाहणं औसुक्याचं ठरणार आहे.


कोण आहेत रवी राजा?


- सायन कोळीवाड्यातून पाच वेळा नगरसेवक म्हणून विजयी
- पाच वर्ष मुंबई महापालिकेचे विरोधीपक्ष नेते म्हणून त्यांनी काम पाहिलंय.
- काँग्रेस पक्षात 44 वर्ष सक्रिय होते.
- मुंबई काँग्रेसमध्ये अनेक पदं भुषवलीयेत
- सायन कोळीवाडा मतदारसंघात त्यांचा चांगला प्रभाव आहे.
- काँग्रेस खासदार वर्षा गायकवाड यांच्यावर एककल्ली कारभाराचा आरोप केलाय.