Maharashtra Assembly Elections 2024 : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यंदाच्या विधानसभा निवडणुकीत हरतील असा मोठा दावा, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे. झी २४ तासला दिलेल्या विशेष मुलाखतीमध्ये त्यांनी हे विधान केलं. फडणवीस नागपूर दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढत आहेत. त्यांच्याविरोधात काँग्रेसकडून प्रफुल गुडधे निवडणूक रिंगणात आहेत. विदर्भात महाविकास आघाडीचा स्ट्राईक रेट 90 टक्के इतका असेल असं भाकितही त्यांनी यावेळी वर्तवलं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बंडखोरांचा प्रचार करणाऱ्यांवर कारवाई करू असं सूचक विधान नाना पटोलेंनी केलंय.. नागपुरात काँग्रेसचे काही नेते बंडखोरांचा प्रचार करताहेत त्यावरून नाना पटोलेंनी इशारा दिलाय.. लाडक्या बहिणींना मविआचं सरकार आल्यावर 3 हजार देणार असल्याचंही पटोले म्हणालेत.. यावेळी पटोलेंनी भाजपवर जोरदार निशाणा साधलाय.. तसेच विदर्भात मविआचा स्ट्राईक रेट 90 टक्के असणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय..   24 तासचे संपादक कमलेश सुतार यांनी त्यांच्याशी खास बातचीत केली.


देवेंद्र फडणवीस स्वतःला पैलवान समजतात मात्र आपल्याकडे वस्ताद आहे. वस्ताद एक डाव नेहमी राखून ठेवतात. असं म्हणत आमदार रोहित पवारांनी फडणवीसांवर निशाणा साधलाय. तर लोकसभेत एक डाव वापरला विधानसभेत अनेक डाव वापरतील. असंही ते म्हणाले.


राष्ट्रवादी SP चे उमेदवार गणेश गीतेंच्या बंधुंवर झालेल्या हल्ल्याप्रकरणी सुप्रिया सुळेंनी फडणवीसांवर जोरदार निशाणा साधला. मविआ उमेदवारांच्या केसाला जरी धक्का लागला तर याला फडणवीस आणि सरकार जबाबदार राहील. असं वक्तव्य सुप्रिया सुळेंनी केलं.