महाराष्ट्राच्या राजकारणात नाट्यमय घडामोडी; बैलगाडीतून अर्ज भरायला गेलेल्या उमेदवारांसाठी भाजपने विमान पाठवले
Nashik Vidhan Sabha Election 2024 : शिर्डी विधानसभा मतदारसंघात बंडखोरी रोखण्यासाठी भाजपचे प्रयत्न सुरु आहेत. अशातच बंडखोराची समजूत काढण्यासाठी भाजपने विमान पाठवले आहे.
Maharashtra Assembly Elections 2024 : निवडणूक आयोगाच्या घोषणेनंतर महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु झाली आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात नाट्यमय घडामोडी पहायला मिळत आहेत. 29 ऑक्टोबर ही उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटी तारीख होती. यामुळे नाशिकमध्ये शिवसेना शिंदे पक्षाने हेलिकॉप्टरने AB फॉर्म पाठवले होते. यानंतर आता शिर्डीत बैलगाडीतून अर्ज भरायला गेलेल्या उेमदवारांसाठी भाजपने खाजगी विमान पाठवले. राजकीय वर्तुळात याची चांंगलीच चर्चा रंगली आहे.
शिर्डी विधानसभा मतदारसंघात बंडखोरी रोखण्यासाठी भाजपचे प्रयत्न सुरु आहेत. भाजपचे राजेंद्र पिपाडा आणि त्यांच्या पत्नीने बंडखोरी करत अपक्ष अर्ज दाखल केला. ही बंडखोरी शमवण्यासाठी बंडखोरांना मुंबईत बोलावलं. राजेंद्र पिपाडा आणि त्यांच्या पत्नीसाठी शिर्डीत स्पेशल चार्टड फ्लाईट पाठवण्यात आलं.
भाजपचे राजेंद्र पिपाडा आणि त्यांच्या पत्नी बैलगाडीने उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठ बैलगाडीने गेले होते. शिर्डी विधानसभा मतदारसंघातील बंडखोरी रोखण्यासाठी भाजप कडून प्रयत्न सुरू आहेत. त्यांनी बंडखोरी करत अपक्ष अर्ज दाखल केला. शिर्डी विधानसभा मतदारसंघात राधाकृष्ण विखे पाटील भाजपाचे अधिकृत उमेदवार आहेत. गेल्या काही महिन्यांपासून पिपाडा विखेंवर करत होते टीका. शिर्डी मतदारसंघाचा तिढा सोडवण्यासाठी मुंबईत बैठक आयोजीत करण्यात आली आहे. या बैठकीला राजेंद्र पिपाडा आणि त्यांच्या पत्नी पत्नीला बोलवण्यासाठी भाजपने विमान पाठवले. या स्पेशल विमानाने दोघेही मुंबईकडे रवाना झाले.