Maharashtra Assembly Elections 2024 : राष्ट्रवादीच्या फुटीनंतर राज्यातील राजकारणात भूकंप झाला. अजित पवारांनी भाजपसोबत का गेलो याचं कारण सांगितलंय. आता अजित पवारांनी कारण सांगितल्यानंतर  पुतण्या आणि काकांमध्ये वार-पलटवार सुरू आहेत. मी पवार साहेबांना सोडलं नाही असं अजित पवार म्हणाले.  मग भाजप सोबत का गेला? असा सवाल शरद पवारांनी उपस्थित केला आहे.  


हे देखील वाचा... महाराष्ट्रातील 2 शहरं भारतातील श्रीमंत शहरांच्या यादीत; पहिले नाही तर दुसरे नाव ऐकून शॉक व्हाल


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राष्ट्रवादीच्या फुटीनंतर गेल्या दीड वर्षात अनेकदा अजित पवारांनी शरद पवारांची साथ का सोडली ? असा प्रश्न उपस्थित होत होता. याची अनेक कारणं आतापर्यंत अजित पवारांनी सांगितली. मात्र,आता अजित पवारांनी पुन्हा एकदा शरद पवारांची साथ का सोडली? याचं कारण सांगितलंय. मी पवार साहेबांना सोडलं नाही... सगळ्याच आमदारांच्या मतानुसार महायुतीत सहभागी होण्याचा निर्णय घेतल्याचं सूचक विधान अजित पवारांनी केलंय. 


शरद पवारांना सोडलं नाही असं विधान अजित पवारांनी केल्यानंतर शरद पवारांनी प्रत्युत्तर दिलंय. ज्यांच्याविरोधात लढले,त्या भाजपसोबत गेले मग सोडलं कसं नाही ? असा सवाल टू द पॉईंटमधील खास मुलाखतीत शरद पवारांनी अजित पवारांना केला आहे. 


 शरद पवारांना सोडलं नाही असं विधान अजित पवारांनी काही दिवसांपूर्वी केलं होतं. त्या वक्तव्याला शरद पवारांनी उत्तर दिलंय.ज्यांच्याविरोधात लढले,त्या भाजपसोबत गेले. मग सोडलं कंसं नाही ? असा सवाल टू द पॉईंटमधील खास मुलाखतीत शरद पवारांनी अजित पवारांना केलाय.अजित पवारांनी विचारधारा सोडली आणि नवी विचारधारा स्वीकारल्याचं शरद पवार म्हणालेत.काही दिवसांपूर्वी मी शरद पवारांना सोडलं नाही असं विधान अजित पवारांनी केलं होतं.त्यांच्या विधानाला शरद पवारांनी टू द पॉईंटमधील कार्यक्रमातून उत्तर दिलंय. आता मतदानाला अवघे काही तास शिल्लक राहिले असताना अजित पवारांचं विधान आणि शरद पवारांनी दिलेलं प्रत्युत्तर याची राजकीय चर्चा रंगली.