Maharashtra Assembly Elections 2024 :   विधानसभा निवडणुकीची घोषणा होताच राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. निवडणुका जाहीर झाल्या तरी अद्याप जागा वाटपाचा तिढा सुटलेला नाही.  महाविकास आघाडीमध्ये जागावाटपावरुन वाद निर्माण झाला आहे. आता शरद पवारचं ठाकरे गट आणि काँग्रेसमधील वाद मिटवणार आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

महाविकास आघाडीमध्ये जागावाटपावरुन वाद सुरु आहेत. हा वाद मिटवण्यात शरद पवार यांनी पुढाकार घेतला आहे. विदर्भातील तिढा असलेल्या जागांवरुन काँग्रेस आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातला वाद चव्हाट्यावर आला होता. त्यामुळे आघाडीत बिघाडी होण्याची चर्चाही सुरु झाली होती. अशा परिस्थितीत शरद पवार यांनी स्वतः दिल्लीतील काँग्रेस नेत्याना फोन केला. तसंच मविआतील वाद मिटवण्यासाठी शरद पवारानी काँग्रेस नेत्यांशी चर्चाही केली आहे.  


महाविकास आघाडीत जागावाटपावरून वाद विकोपाला 


महाविकास आघाडीत जागावाटपावरून वाद विकोपाला गेलेत.. काँग्रेस आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात जागावाटपावरून चांगलंच घमासान सुरु असल्याचं पाहायला मिळत आहे. त्यातच आता उद्धव ठाकरेंनी आपल्या मित्रपत्र असलेल्या काँग्रेसला निर्वाणीचा इशारा दिलाय. त्यामुळे ऐन विधानसभेच्या धामधुमीत मविआत जागावाटपावरून चांगलीच घमासान पाहालया मिळत आहे..


काँग्रेस प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी महाविकास आघाडीचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांची भेट घेतली...पवारांच्या सल्ल्यानुसारच पुढील रणनीती राहणार असल्याचं चेन्नीथला यांनी म्हंटलंय...त्याचबरोबर उद्धव ठाकरेंसोबतही चर्चा झाल्याचं त्यांनी सांगितलं... महाविकास आघाडीमध्ये कोणतेही मतभेद नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं... तर, एक ते दोन दिवसांत महाविकास आघाडीचं जागावाटप पूर्ण होणार असल्याची माहिती त्यांनी दिली. यावेळी त्यांनी महायुतीवर जोरदार टीका केली...