ठाण्यात गोंधळ; उद्धव ठाकरेंच्या सभेचा स्टेज खचला
Uddhav Thackeray : ठाण्यात उद्धव ठाकरेंच्या सभेचे आयोजन करण्यात आले होते. सभा संपल्यानंतर उद्धव ठाकरे यांचा स्टेज कोसळला.
Maharashtra Assembly Elections 2024 : विधानसभा निवडणुकीचा प्रचाराला अवघे काही तास उरले आहेत. उद्धव ठाकरे यांनी राज्यभरात प्रचार सभांचा धडका लावला आहे. उद्धव ठाकरे यांच्या ठाण्यातील सभेत स्टेज खचला घटना घडली आहे. या घटनेत कोणालाही दुखापत झालेली नाही. मात्र, सभास्थळी मोठा गोंधळ उडाल्याचे चित्र पहायला मिळाले.
ठाण्यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे स्वाभिमान सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेला उद्धव ठाकरे उपस्थित होते. उद्धव ठाकरे यांची सभा संपल्यानंतर ठाकरे मंचावर असतानाच मंचांचा मधला भाग खचला. ठाकरे सर्व कार्यकर्त्यांशी चर्चा करत असताना मंचावर गर्दी जमली आणि यामुळेमंचांचा मधला भाग खचला. मात्र कोणालाही दुखापत झाली नाही मात्र ठाकरे थोडक्यात बचावले. मंचावरील गर्दी कमी झाल्या नंतर ठाकरे एकाबाजूने मंचावरून खाली उतरले. उद्धव ठाकरे यांचे भाषण झाल्यानंतर ते कार्यकर्त्यांशी भेटत असताना स्टेटच्या काही भाग अचानक खचला. ज्यावेळेस स्टेजचा भाग खचला त्यावेळेस उद्धव ठाकरे स्टेजवर उपस्थित होते.
उद्धव ठाकरेंनी आपला जाहीरनामा चोरला असा आरोप मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केला. याबाबत टू द पॉईंट या मुलाखतीत झी २४ तासचे संपादक कमलेश सुतार यांनी प्रश्न उपस्थित केला असता 'शिंदेंनी माझा पक्ष चोरलाय, मी कशाला त्यांचा जाहीरनामा चोरु?' असं वक्तव्य उद्धव ठाकरेंनी केलंय... 'त्यांचा जाहीरनामा नसून थापानामा आहे', असंही ते म्हणाले.
शिवसेना नाव दुस-याला देण्याचा अधिकार कोणाचाही मानूच शकत नाही आणि तो कोणालाही नाही. निवडणूक आयोगालाही नाही असा हल्लाबोल उद्धव ठाकरेंनी केला.शिवसेना नाव माझ्या आजोबांनी आणि वडिलांनी दिलंय त्यामुळे माझी शिवसेना ही शिवसेनाच आहे असंही ते म्हणाले...झी २४ तासचे संपादक कमलेश सुतार यांनी घेतलेल्या टू द पॉईंट या मुलाखतीत त्यांनी हे स्पष्ट केलं.