`पंतप्रधानांनी यावेळी महाराष्ट्रात सभा कमी केल्यामुळे आम्ही अस्वस्थ...`, टू द पॉईंटमध्ये शरद पवारांनी मोदींना डिवचलं
Sharad Pawar On Narendra Modi : विधानसभा निवडणुकीत एकीकडे शरद पवार यांनी महायुती तसंच पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार टीका करताना पाहायला मिळाले. तर दुसरीकडे मात्र,मोदी यांनी राज्यात अनेक ठिकाणी सभा घेत असताना कुठंही शरद पवारांवर टीका केल्याचं दिसून आलं नाही. यावर शरद पवार काय म्हणालेत पाहूया.
Sharad Pawar On Narendra Modi : विधानसभा निवडणुकीत राज्यातील सर्व प्रचार सभेत नरेंद्र मोदींनी शरद पवारांवर टीका करणं टाळलंय. तसेच मोदींनी यावेळी महाराष्टात कमी सभा घेतल्यात. मोदी यांच्याकडून शरद पवार यांच्यावर कोणतीही टीका न केल्यामुळं राजकीय चर्चांना उधाण आलंय. यावर पवारांना विचारलं असता पवारांनी काहीसं खोचक उत्तर दिलंय. नरेंद्र मोदींनी यावेळी महाराष्ट्रात सभा कमी केल्यामुळे आम्ही अस्वस्थ झालो, असं वक्तव्य झी २४ तासच्या टू द पॉईंटमध्ये शरद पवारांनी केलं. मोदींनी आमच्यावर केलेल्या व्यक्तिगत टीकेमुळे आम्हाला फायदाच झाला असंही पवार म्हणाले.
शरद पवारांच्या वक्तव्यावर आता भाजपनं प्रत्युत्तर दिलंय. मोदी तुमच्या सल्ल्यानं बोलणार नाहीत. तुमच्या सल्ल्यामुळे देशाचं काय भलं झालं ? हे सांगा असा सवाल भाजपचे नेते आशिष शेलार यांनी विचारला.
महाराष्ट्रात शरद पवारांवर मानणारा मोठा वर्ग आहे. लोकसभा निवडणुकीच्या वेळी भटकती आत्मा असं म्हणत मोदींनी शरद पवारांवर टीका केल्यानंतर लोकांना ते आवडलं नव्हतं. तसेच त्याठिकाणी महायुतीला फटका बसला. त्यामुळे यावेळी अजित पवारांनीही पश्चिम महाराष्ट्रात त्यांच्या मतदारसंघात भाजप नेत्यांच्या सभा नकोच अशी भूमिका घेतली होती. त्यामुळे या निवडणुकीत मोदींच्या सभा कमी केल्याच्या मुद्यावरून पवारांनी मोदींना डिवचलंय.