महायुती सत्तेत आल्यावर सयाजी शिंदेंना हवंय `हे` खातं, `मला जे साध्य करायचय..`
Sayaji Shinde NCP: सयाजी शिंदे यांनी भविष्यात कोणत्या खात्यात काम करायचंय,याबद्दल स्पष्ट शब्दात सांगितलंय.
Sayaji Shinde NCP: मराठीसह दाक्षिणात्य सिनेसृष्टी गाजवणारे दिग्गज अभिनेते सयाजी शिंदे आता राजकारणाच्या वाटेवर आहेत. काही दिवसांपुर्वी त्यांनी राष्ट्रवादी कॉँग्रेस पार्टीमध्ये प्रवेश केला. सयाजी शिंदे अभिनयानंतर आपल्या समाजकारणासाठी ओळखले जातात. त्यांचं झाडांबद्दल विशेष प्रेम त्यांच्या चाहत्यांना माहिती आहे. दरम्यान सयाजी शिंदे यांनी भविष्यात कोणत्या खात्यात काम करायचंय,याबद्दल स्पष्ट शब्दात सांगितलंय.
सयाजी शिंदे यांनी अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश केला. राष्ट्रवादी काँग्रेसकडून आतापर्यंत दोन याद्या जाहीर झाल्या आहेत. यामध्ये तरी सयाजी शिंदे यांचे नाव आले नाहीय. ते निवडणूक लढवणार का? याबद्दल कोणीतीह माहिती समोर आली नाहीय. दरम्यान सयाजी शिंदे यांनी भविष्यात कोणत्या मंत्रालयात काम करायचंय, याबद्दल सांगितलंय.
अभिनयक्षेत्र, समाजकारण आणी राजकारण एकमेकांचे दुष्मन नसून एकमेकांना पुरक आहेत, असे ते म्हणाले. मला जे उदिष्ट साध्य करायचंय त्यासाठी मी राजकारणात आलोय. युती सरकार पुन्हा सत्तेवर येणार असून मला वनखातं दिलं तर उत्तमच असल्याचं अभिनेते सयाजी शिंदे यांनी म्हणटलंय.
राष्ट्रवादीचे कोपरगावचे आमदार आशुतोष काळे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी अभिनेते सयाजी शिंदे यांनी हजेरी लावली. मोठ्या उत्साहाने निघालेल्या रॅलीत सयाजी शिंदे यांना लोकांनी खांद्यावर उचलून घेतले होते. समाजकारण, अभिनयक्षेत्र आणी राजकारण हे एकमेकांचे दुष्मन नाही तर एकमेकांना पूरक आहेत. राज्यात पुन्हा युतीचं सरकार येणार असून माझं उद्दिष्ट साध्य करण्यासाठी मला वनखातं दिलं तर उत्तमच असल्याचं सयाजी शिंदे यांनी यावेळी म्हणटलंय.