Sharad Pawar on Dilip Walse Patil: महाविकास आघाडीचे नेते शरद पवार यांनी आंबेगाव विधानसभा मतदार संघाच्या उमेदवाराच्या प्रचारार्थ भाषण केले. या सभेत बोलताना त्यांनी सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांची चांगलीच खरडपट्टी काढली. 'आता यांनी बोलायला काय ठेवलं आहे का? त्यांनी एकचं गोष्ट ठेवली, फक्त गद्दारी केली. ज्यांनी गद्दारी केली, त्यांना शिक्षा द्यायची असते. महाराजांसोबत ज्यांनी गद्दारी केली त्यांना कधी सोडलं का? त्यामुळं आपल्यासोबत गद्दारी केली, त्यांना सुट्टी नाही. या गद्दारांचा मोठ्या फरकाने पराभव करा आणि देवदत्त निकमांना आमदार बनवा असं शरद पवारांनी म्हटल आहे. मंचर येथील सभेत शरद पवार बोलत होते.


'दिलीप वळसेंचा मंत्री पदापर्यंतचा प्रवास माझ्यामुळं'


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आंबेगाव तालुक्याचं अन माझं एक अतूट नातं आहे. अगदी दिलीप वळसेंना इथून मी संधी देण्याआधी पासून माझं या तालुक्याशी संबंध येत गेलाय. दिलीप वळसेंना मी संधी दिली, ते आमदार झाले याचा मला आनंद होता. पुढं मी त्यांना मंत्री केलं. विविध पदं दिली. विश्वास ठेवला, संधी दिली. जे जे शक्य होतं, ते दिलं, असे पवार म्हणाले.


दिलीप वळसे हे गद्दार अन आता गद्दारांना सुट्टी नाही'


ज्यांना मी पद दिली, शक्ती दिली, अधिकार दिला, सन्मान दिला यांच्याकडून मला काही नको. आज लोक त्यांच्यावर नाराज आहेत. मंत्रिमंडळात ते गेल्यानं जनतेला हे आवडलेलं नाही. आज म्हणतात आमचे आणि पवार साहेबांचे संबंध अतिशय सलोख्याचे आहेत, असं अजिबात नाही, असे शरद पवार दिलीप वळसेंना उद्देशून म्हणाले. 


'फक्त गद्दारी केली'


आता यांनी बोलायला काय ठेवलं आहे का? त्यांनी एकचं गोष्ट ठेवली, फक्त गद्दारी केली. ज्यांनी गद्दारी केली, त्यांना शिक्षा द्यायची असते. महाराजांसोबत ज्यांनी गद्दारी केली त्यांना कधी सोडलं का? त्यामुळं आपल्यासोबत गद्दारी केली, त्यांना सुट्टी नाही. या गद्दारांचा मोठ्या फरकाने पराभव करा आणि देवदत्त निकमांना आमदार बनवा, असे आवाहन पवारांनी केले.


पियूष गोयल यांची शरद पवारांवर टीका 


लोकसभेत मविआ ने लोकांची दिशाभूल करून खोटा प्रचार केला. एकदा जनता फसली पण दुसऱ्यांदा ही जनता फसणार नाही, असे पियूष गोयल म्हणाले. शरद पवार केंद्रात 10 वर्ष मंत्री होते. त्यांनी मराठा समाजासाठी आणि शेतकऱ्यांसाठी काहीच केलं नाही. ज्या ज्या वेळेस नरेंद्र मोदी आणि महायुतीची डबल इंजिनची सरकारने काम केलं तेव्हा शेतकऱ्याचा उद्धार झाला. मराठा आरक्षण आणि मराठा समाजाच्या उज्वल भविष्यासाठी अनेक योजना माहिती सरकारने आणले आहेत असं म्हणत केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी शरद पवार यांच्यावर टीका केली आहे.