Ramdas Athawale on Seat Allocation: आगामी विधानसभा निवडणुकीसाठी महायुतीकडून जागावाटप जाहीर करण्यात येत आहे. भाजप, एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी एकत्र लढतेय. यासोबतच आरपीआय, रासप यांच्यासह इतर पक्षही महायुतीसोबत आहेत. दरम्यान या विधानसभा निवडणुकीत आरपीआयला 4 ते 5 जागा हव्या आहेत.  केंद्रीय राज्य मंत्री रामदास आठवले जागा वाटपावरुन नाराज आहेत. त्यांनी नुकतीच सागर बंगल्यावर जाऊन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली. आता ते मुख्यमंत्र्यांसोबतदेखील चर्चा करणार आहेत. य


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मी आणि माझ्या पक्षातले अनेक कार्यकर्ते नाराज आहेत. आमचा पक्ष छोटा जरी असला तरी आम्हाला महायुतीत जागा हव्या आहेत. यासंदर्भात मागे मी फडणविसांनी पत्र दिले होते. किमान 5 जागा आरपीआयला द्या, अशी मागणी मी केल्याचे त्यांनी सांगितले. 


कार्यकर्ते नॉमिनेशन साठी जाणार नाही असे म्हणत आहेत. 2012 मध्ये भाजपसोबत आम्ही भाजपसोबत आलो पण आता आरपीाय कुठे दिसत नाही. यासंदर्भात मी फडणवीसांकडे नाराजी व्यक्त केली. धारावी किंवा चेंबूरची जागा मिळावी हा आमचा आग्रह आहे. आम्ही महामंडळाची मागणी केली आहे. या बैठकीत जिल्हापरिषद, महापालिका यासंदर्भात चर्चा झाल्याचे आठवले म्हणाले. 


RPI ला डावलून चालणार नाही. आम्हाला सत्तेचा वाटा मिळाला पाहिजे. माझी पाऊण तास चर्चा झाली. मी केंद्रात मत्री असल्याने इतर राज्यात देखील पक्षाच्या जागा वाढवतो. महायुतीत जागा मिळाल्या पाहिजेत. मला वाईट वाटतंय. आम्ही सातत्याने महायुती सोबत आहोत. तरीही आम्हाला जागावाटपात स्थान मिळत नाही. आम्हाला नांदेडमधील जागा हवी होती. अनेक जागा हव्या होत्या. आम्ही 5-4 जागांची अपेक्षा ठेवली होती, असे आठवले म्हणाले. देवेंद्र फडणवीस यांना पात्र लिहिले आहे, त्यात आमच्या मागण्या आहेत. आम्हाला 1 एमएलसीदेखील हवी आहे, असे ते म्हणाले.


जागावाटपात विचारात घेतलं गेलं नाही तरी महायुतीसोबत का? रामदास आठवलेंनी खरं कारण...'


काँग्रेस पक्ष हा मजबूत करण्यापेक्षा तुम्हाला खीळखीळा करतो असे यावेळी आठवले म्हणाले. तसेच उद्धव ठाकरे यांनी महायुतीकडे परत यावं. उद्धव ठाकरे हे महायुती सोबत राहिले असते तर एकनाथ शिंदे फुटले नसते. देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांची भेट निवडणुकीनंतर होऊ शकते, असे भाकीत त्यांनी वर्तवले आहे.


5 जागा तरी मिळतील ही अपेक्षा


महायुतीत रामदास आठवले दिसतात पण त्यामध्ये आरपीआयच्या जागा दिसत नाही. याबद्दल त्यांना प्रश्न विचारण्यात आला. त्यावर बोलताना आम्ही 21 जागांची मागणी केली आहे. पण चर्चेत आम्हाला कधी बोलावले नाही. सध्याच्या घडीला 8-10 जागा मागितल्या होत्या पण मिळतील असं वाटत नाही. 5 जागा मिळतील अशी आमची मागणी आहे. अन्यथा आम्हाला एमएलसी, महामंडळ मिळायला हवे. माझ्या पक्षाचे कार्यकर्ते नाराज आहेत. आपल्याला किती जागा मिळाल्या? असे मला रोज फोन येतात, असेही आठवलेंनी यांनी सांगितले. 


महायुतीच्या जागावाटपात विचारात घेतले गेले नाही


बाळासाहेबांच्या आवाहनानंतर शिवशक्ती-भिमशक्तीसाठी मी सगळीकडे फिरलो. त्याआधी माझी भाजप विरोधी भूमिका होती.2012 च्या बीएमसी निवडणूकीत आरपीआय आल्यानंतर महायुती तयार झाली. आता दोन मोठे पक्ष आल्याने आरपीआय कुठे दिसत नाही. आरपीआयला दुर्लक्षित करणे चांगल होणार नाही. त्या पत्रकार परिषदेत मला बोलायला दिले नाही. विश्वासात घेतले जात नाही, अशी खंत त्यांनी बोलून दाखवली. 


तरी  रामदास आठवले युतीसोबत का आहेत? 


असं असतानाही रामदास आठवले युतीसोबत का आहेत? असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला. याला उत्तर देताना ते म्हणाले, 'मला मोदींनी मंत्रिपद दिलंय हे याचे उत्तर नाही. तर नागालॅण्डमध्ये आमचे 2 खासदार आहे. मणिपूरमध्ये माझ्या उमेदवाराला १७ टक्के बहुमत होते. अनेक राज्यांमध्ये आरपीआयच्या शाखा आहेत. मी मंत्री असल्यामुळे संपूर्ण देशात फिरण्याची मला संधी मिळते. अन्याय होतोय पण लगेच निर्णय घेणे माझ्यासाठी थोडं अडचणीचं आहे, असे उत्तर त्यांनी दिले. सर्व माझ्यासोबत असल्याने मी उलट भूमिका घेत नाही. आम्ही इतका त्याग करतो तर 3 ते 4 जागा द्यायला हव्या, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.