Supriya Sule And Ajit Pawar: अजित पवारांनी शरद पवार निवृत्त होणार आहेत, त्यामुळे त्यांच्यानंतर बारामतीचा विकास करण्यासाठी मीच सक्षम असल्याचा दावा केलाय. तर अजित पवारांच्या टीकेला सुप्रिया सुळेंनी उत्तर दिलंय. दुश्मनही असा विचार करणार नसल्याचं सुळे म्हणाल्यात.दादा विरुद्ध ताईंचा सामना पाहायला मिळतो.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शरद पवारांच्या राजकीय निवृत्तीवरून अजितदादा विरुद्ध सुप्रियाताई असा सामना रंगलाय. शरद पवारांनी राजकारणातून निवृत्त होण्याचे संकेत दिले होते. तोच धागा पकडून अजित पवारांनी शरद पवारांवर अप्रत्यक्ष टीका केलीय.शरद पवारांनंतर बारामतीत पुढे कोण असा सवाल करत अजित पवारांनी आपली दावेदारी पुढे केलीय. येवढचं नाही तर मी अजूनही थकलो नाही, खूप काम करू शकतो असंही दादा म्हणालेत.. 


अजित पवारांनी शरद पवारांच्या वयावरून पुन्हा टीका केल्यानंतर आत सुप्रिया सुळेंनी त्यांना उत्तर दिलंय. कुणाची शेवटची निवडणूक आहे असं दुश्मनही बोलत नाही, अजित पवार असं कसं बोलू लागले असा सवाल सुप्रिया सुळे यांनी केलाय. बारामतीत लोकसभेनंतर आता विधानसभेत पुन्हा पवार कुटुंबीय आमनेसमाने आलंय. शरद पवार आणि अजित पवारांकडून मतदारांना भावनिक साद घालण्यातही येतेय.त्यामुळे बारामतीची जनता कुणाला साथ देणार हेच आता पाहवं लागणार आहे.


शरद पवारांचा दिलीप वळसेंना जाहीर इशारा, 'हे गद्दार अन्...' 


सुप्रीम कोर्टाने अजित पवारांच्या राष्ट्रवादीला फटकारलं


सुप्रीम कोर्टाने अजित पवारांच्या राष्ट्रवादीला शरद पवारांचे फोटो, व्हिडीओ न वापरण्याची सूचना केली आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुप्रीम कोर्टाने ही सूचना केली आहे. महाराष्ट्रात 20 नोव्हेंबरला विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होणार असून, 23 नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे. न्यायालयाने आपल्या आधीच्या आदेशाची आठवण करुन देत ही सूचना केली आहे. दोन्ही बाजूंनी निवडणुकीपूर्वी त्यांची वेगळी ओळख कायम ठेवण्यास कोर्टाने सांगितलं होतं. सुप्रीम कोर्टाने राष्ट्रवादी काँग्रेसला आपल्या पायांवर उभं राहण्यास शिका अशा शब्दांत सुनावलं आहे. तसंच आपल्या पक्षाची वेगळी ओळख जपा असंही सांगितलं आहे. “शरद पवारांशी वैचारिक मतभेद आहेत तर आता स्वतःच्या पायावर उभे राहायला शिका. एकदा तुम्ही शरद पवार यांच्यापासून वेगळे झाल्यानंतर तुम्ही त्यांचे नाव, फोटो किंवा व्हिडिओ वापरू नये," असं सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं.