धुळे : धुळ्यात मराठा क्रांती मोर्चातर्फे पुकरण्यात आलेल्या बंदचा शंभर टक्के परिणाम जनजीवनावर दिसून येतो आहे. शाळा बंद ठेवण्यात आल्या आहेत त्यामुळे परिक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. तर धुळे शहरात कडकडीत बंद ठेवण्यात आला आहे. शहरात सतराशे पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शिरपूर तालूक्यात मात्र बंद पाळण्यात आलेला नाही. आधीचा बंद यशस्वी झाल्यामुळे आज शिरपुरात बंद नाही. बंदच्या पार्श्वभूमीवर धुळे जिल्ह्यातील सर्व एसटी बस सेवा बंद ठेवण्यात आली आहे. बंद दरम्यान कुणीही हिंसक आंदोलन करू नये असं आवाहन आयोजकांनी केले आहे. या बंदमुळे जिल्ह्यात हिंसक आंदोलन होणार नसले तरी कोट्यावधीची उलाढाल मात्र टप्प झाली आहे.



नाशिकमध्ये देखील बंदचा परिणाम दिसतो आहे. रस्त्यावर वाहनांची संख्या कमी आहे. बस सेवा बंद ठेवण्यात आली आहे. मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलं आहे. सरकारी शाळा सुरु असल्या तरी विद्यार्थ्यांची संख्या कमी आहे. जागतिक आदिवासी दिवसांच्या निमित्ताने शांतता राखण्याचं आवाहन मराठा आंदोलकांनी दिलं आहे.