वसई : भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणानंतर पुकारण्यात आलेल्या महाराष्ट्र बंदचे पडसाद आज वसई विरारमध्येही पहायला मिळाले.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आज सकाळी विरार रेल्वे स्थानकात संतप्त जमावाने रेल रोको केला होता. तर वसई स्टेशन परिसरातील दुकानही बंद होती. 


सकाळी सुरु असलेली एसटी सेवा ही आंदोलनकर्त्यांनी बंद पाडली. नालासोपारा - अचोले रोड ही बंद केला होता... तर वसई रेंज ऑफिस नाका ही बंद करण्यात आला होता. सध्यातरी परिस्थिति नियंत्रणात आहे. 





दरम्यान गोरेगाव रेल्वे स्थानकावरही सकाळी साडे आठ वाजल्याच्या सुमारास रेल रोकोचा प्रयत्न करण्यात आला होता. जवळपास १५-२० मिनिटं रेल्वे थांबवण्यात आल्या... त्यामुळे पश्चिम रेल्वेची वाहतूक १०-१५ मिनिटे उशिरानं सुरु आहे.