Maharashtra Board Exams 2023 Date Sheet Released:  महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (Maharashtra State Board of Secondary and Higher Secondary Education) इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षांचे (SSC-HSC Board Exam 2023 Time Table) अंतिम वेळापत्र जाहीर करण्यात आले आहे. त्यानुसार बारावीची परीक्षा 21 ते फेब्रुवारीपासून सुरू होणार असून 21 मार्चपर्यंत ही परीक्षा चालेल. तर दहावीची परीक्षा 2 ते 25 मार्च या दरम्यान होईल. याचपार्श्वभूमीवर परीक्षेतील गैरप्रकार थांबविण्यासाठी पहिल्यांदाच पुणे बोर्डाने नवतंत्रज्ञानाचा वापर करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे परीक्षा केंद्रावर गैरप्रकार होणार नाहीत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे नाशिकसह, पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, लातूर व कोकण या 9 विभागीय मंडळांमार्फत परीक्षा पार पडेल. दरम्यान खासगी शाळा-महाविद्यालयांच्या अनेक तुकड्या पटसंख्येअभावी बंद कराव्या लागल्या आहेत. त्यामुळे अनेक शिक्षथ अतिरिक्त झाले असून त्यांची पदे रद्द करावी लागली आहेत. भविष्यात शाळा-महाविद्यालयांमध्ये पटसंख्या कमी होऊ नये म्हणून काही परीक्षा केंद्रांवर कॉपी पुरवल्या जातात. त्यामुळे हुशार विद्यार्थ्यांवर अन्याय होतो.


या पार्श्वभूमीवर पुणे बोर्डाने नवतंत्रज्ञानाचा वापर करून 10वीचे 17 लाख आणि 12 वीचे 15 लाख विद्यार्थी परीक्षा देणार असून त्यासाठी नऊ हजार केंद्रे असणार आहेत. सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याची बाब खर्चिक असल्याने सध्या परीक्षकांच्या मोबाईलवर झूम कॉल करुन परीक्षा हॉलमधील तीन तासांचे शुटिंग केले जाणार आहे. यामध्ये परीक्षा सुरु झाल्यापासून उत्तरपत्रिका संकलित करेपर्यंतचे परीक्षकांच्या मोबाईलमध्ये त्याचे शुटिंग केले जाणार आहे.


तर दुसरीकडे या केंद्राबाहेर बैठे पथक असणार आहेत. भरारी पथक पण विविध परीक्षा केंद्रांना भेटी देईल, असे बोर्डाचे नियोजन केले आहे. दरम्यान नागरिकांना देखील त्यासंदर्भात सूचना त्यांचे उपाय मागवले असून 26 जानेवारीपूर्वी त्यासंबंदीधीचा अंतिम निर्णय होईल, असे सांगण्यात आले आहे.  


या तारखेला होणार परिक्षा


इयत्ता बारावीच्या विद्यार्थ्यांची प्रात्यक्षिक परीक्षा 1 ते 20 फेब्रुवारी या कालावधीत होणार आहे. तसेच दहावीच्या विद्यार्थ्यांची प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी परीक्षा व अंतर्गत मूल्यमापन परीक्षा 10 फेब्रुवारी ते 1 मार्चपर्यंत पार पडेल.