Maharashtra Budget 2023: राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आज शिंदे सरकारचा पहिला अर्थसंकल्प (Maharashtra Budget 2023) मांडत आहेत. देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी महिला, शेतकरी, आरोग्याशी संबंधित अनेक योजना जाहीर केल्या आहेत. दरम्यान यावेळी त्यांनी रस्त्यांसाठीही निधी जाहीर केला. यावेळी त्यांनी रस्त्यांचा दर्जा सुधारण्यासाठी मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत रस्ते बांधताना सिमेंट कॉक्रिट तसंच नव्या तंत्रज्ञानाचा वापर केला जाईल अशी घोषणा केली. यावेळी सत्ताधारी आमदारांनी बाक वाजवत एकच जल्लोष केला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पंतप्रधान ग्रामसडक योजनेंतर्गत महाराष्ट्रासाठी साडे सहा हजार किमी लांबीचे उद्दिष्ट देण्यात आलं आहे. यापैकी साडे पाच हजार किमी लांबीच्या रस्त्यांची कामं प्रगतीपथावर आहेत अशी माहिती यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी दिली. पुढे बोलताना त्यांनी सांगितलं की, मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत रस्ते बांधताना सिमेंट कॉक्रिट तसंच नव्या तंत्रज्ञानाचा वापर केला जाईल. फडणवीसांच्या या घोषणेचं सत्ताधारी आमदारांनी बाक वाजवक कौतुक केलं. 


रस्त्यांसाठी निधी...


 
- पुणे रिंगरोडसाठी भरीव निधीची तरतूद
- मुंबई-पुणे मिसिंग लिंकच्या कामासाठी निधी
- विरार-अलिबाग मार्गासाठी निधीची तरतूद
- रायगड जिल्ह्यातील रेवस ते रेड्डी, सिंधुदुर्ग सागरी महामार्गासाठी निधी
- हायब्रीड अ‍ॅन्युईटीतून 7500 कि.मी.चे रस्ते, यासाठी 90,000 कोटी रुपये
- आशियाई बँक प्रकल्पातून 468 कि.मी.चे रस्ते, 4000 कोटी रुपये
- रस्ते व पुलांसाठी 14,225 कोटी रुपये, यातून 10,125 कि.मी.चे कामे, 203 पूल व मोर्‍यांची कामे
- जिल्हा मार्ग व ग्रामीण मार्ग : 4500 कि.मी./3000 कोटी रुपये
- प्रधानमंत्री ग्रामसडक योजना : 6500 कि.मी.
- मातोश्री ग्रामसमृद्धी पाणंद शेतरस्त्यांसाठी नवी योजना
- सीमावर्ती भागातील गावांमध्ये रस्ते, वीज, पाणी, शिक्षण, आरोग्यासाठी योजना


 


मेट्रो प्रकल्प



- मुंबईत 337 कि.मी. मेट्रोचे जाळे/46 कि.मी. खुला/आणखी 50 कि.मी. यावर्षी खुला
मुंबईतील नवीन प्रकल्प
- मुंबई मेट्रो 10 : गायमुख ते शिवाजी चौक मीरा रोड/9.2 कि.मी/4476 कोटी
- मुंबई मेट्रो 11 : वडाळा ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस/12.77 कि.मी/8739 कोटी रुपये
- मुंबई मेट्रो 12 : कल्याण ते तळोजा/20.75 कि.मी/5865 कोटी रुपये
- नागपूर मेट्रोचा दुसरा टप्पा: 43.80 कि.मी./6708 कोटी
- पुणे मेट्रो : 8313 कोटींची कामे प्रगतीपथावर
- अन्य नवीन प्रकल्प : ठाणे वर्तुळाकार मेट्रो, नाशिक निओ मेट्रो, पुणे मेट्रोच्या पिंपरी-चिंचवड ते निगडी कॉरिडॉर आणि स्वारगेट ते कात्रज मेट्रो



रेल्वे प्रकल्प अन् बसस्थानकांचे आधुनिकीकरण


 
- नाशिक-पुणे हायस्पीड रेल्वेला निधी
- सोलापूर-तुळजापूर-धाराशिव ब्रॉडगेज : 84 कि.मी/452 कोटी रुपये
- नांदेड-बिदर, फलटण-पंढरपूर, खामगाव-जालना, वरोरा-चिमूर-कांपा या 4 प्रकल्पांना 50 टक्के राज्यहिस्सा देणार
- सेतूबंधनअंतर्गत राज्य रेल्वेफाटक मुक्त करण्यासाठी 25 नवीन उड्डाणपूल
- 100 बसस्थानकांचे आधुनिकीकरण आणि पुनर्बांधणीसाठी सुमारे 400 कोटीरेल्वे प्रकल्प अन् बसस्थानकांचे आधुनिकीकरण