Maharashtra Budget 2023: शेतकरी प्रश्नावर सत्ताधारी आणि विरोधकांत जोरदार जुंपली; Eknath Shinde आक्रमक, अजितदादा संतापलेत
Maharashtra Budget 2023 : शेतकरी प्रश्नावरवरुन विरोधकांनी शिंदे - फडणवीस सरकारला जोरदार घेरले. शेतकऱ्यांना तातडीने मदत करणार आहात की नाही, केवळ आश्वासन नको. ठोस निर्णय घ्या. याबाबत विरोधकांनी सूचना केली. मात्र, विधानसभा अध्यक्ष यांनी चर्चा करण्यास नकार देत विरोधकांची सूचना फेटाळून लावली. त्यानंतर सभागृहात विरोधक चांगलेच आक्रमक झालेत.
Maharashtra Budget 2023 : राज्यात अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे मोठ्याप्रमाणात नुकसान झाले आहे. बळीराजा आर्थिक संकटात सापडला आहे. शेतकरी प्रश्नावरवरुन विरोधकांनी शिंदे - फडणवीस सरकारला जोरदार घेरले. शेतकऱ्यांना तातडीने मदत करणार आहात की नाही, केवळ आश्वासन नको. ठोस निर्णय घ्या. याबाबत विरोधकांनी सूचना केली. मात्र, विधानसभा अध्यक्ष यांनी चर्चा करण्यास नकार देत विरोधकांची सूचना फेटाळून लावली. त्यानंतर सभागृहात विरोधक चांगलेच आक्रमक झालेत. अजित पवार यांनी संताप व्यक्त करत सरकारला धारेवर धरले. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आम्ही मदत देणार आहोत. पंचमाने सुरु आहेत. त्यानंतर मदत करणार आहोत, असे सांगून विषय संपवला. मात्र, छगन भुजबळ यांनी हा प्रश्न पुन्हा उचलून धरला. त्यानंतर मुख्यमंत्री शिंदे चांगलेच आक्रमक झाल्याचे दिसून आले.
अजित पवार यांनी सरकारला पेचात पकडले
राज्याचे प्रमुख त्यांना माहिती द्यायची. एक लाख एकर जमीनवर नुकसान झाले आहे. सर्व विभागाचे आकडे आलेत. कांदा खरेदी माहिती देतात पण वास्तव वेगळे आहे. बळीराज त्रासलेला आहे. कांदा, हरभरा खरेदी अद्याप सुरू केली नाही. तातडीन मदत केली पाहिजे. नाफेडकडून कांदा खरेदी सुरु झालेली नाही, हरभऱ्याची खरेदी सुरु झालेली नाही, असं म्हणत राष्ट्रवादीच्या विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सत्ताधाऱ्यांना पेचात पकडले. Maharashtra Budget 2023 Live Updates: विधानसभेतील कामकाजाबाबत अपडेट जाणून घ्या
मुख्यमंत्री शिंदे यांचा विरोधाकांवर हल्लाबोल
मुख्यमंत्री शिंदे यांनी शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर विरोधाकांवर हल्लाबोल केला. शेतकरी प्रश्नावर सरकार गंभीर आहे. शेतकऱ्याला कोणीही वाऱ्यावर सोडणार नाही. त्यांना मदत केली जाईल. शेतकरीचे अवकाळी पावसाने नुकसान झाले आहे. याबाबत तातडीने पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत. पंचनामे सुरू आहेत. सभागृह भावना आणि सरकारची भावना एकच आहेत. शेतकऱ्यांना पैशाची मदत द्यायची की राजकारण करायचे, हे सांगा, असे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले. या आधीचे नियम बाजूला ठेवत शेतकरीना मदत केली. सरकारने हात आखडता घेतला नाही, हे सरकार शेतकऱ्यांचे आहे. शेतकऱ्यांच्या मागे सरकार आहेत. विरोधक एकत्र राहू, राजकारण न करता काम करु, असे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.
तुमच्या सारखं शेतकरी तोंडाला पाने पुसले नाहीत. आम्ही 12 हजार कोटी रुपये दिले. तुम्ही 50 हजार मदत दिली. शेतकऱ्यांना तुम्ही नाही तर आम्ही मदत दिली. संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही, अशी आश्वासन यावेळी मुख्यमंत्र्यांनी दिले.
छगन भुजबळ यांनी सत्ताधाऱ्यांना सुनावलं
यावेळी छगन भुजबळ म्हणाले, या बजेटकडून अपेक्षा आहेत. देशाचा विकास दर पेक्षा आपला विकास दर कमी झाला आहे. कर्ज आपले वाढले आहे फक्त व्याज 48 हजार कोटी इतका आहे. हा ताण नागरिकांवर पडतो आहे. अफाट खर्च सुरू आहे त्यावर नियंत्रण नाही. 2014 ला फक्त अडीच लाख कोटी कर्ज होते.ते आता किती वाढले ते बघा. गुजरात राज्य शेतकऱ्यांना किती मदत करते बघा.कुठे तरी खरचाच ताळमेळ बसायला हवा. महसूल उत्पन्न घटणार आहे. 2 वाजता कळेलच आपल्या काय मिळेल ते. निवडणुका लवकर घेत नाही कारण लोकांचा मुड विरोधात आहे.
विधीमंडळ पायऱ्यावर विरोधकांच्या घोषणा
शेतकऱ्याच्या मुद्द्यावरन विधानसभा परिसरात विरोधकांनी जोरदार सरकारविरोधात घोषणाबाजी केली. सत्ताधाऱ्यांविरोधात विधानसभेच्या पायऱ्यांवर विरोधकांचं आंदोलन. 'विकासकामांना स्थगिती देणाऱ्यांचा धिक्कार असो, विकासकामांची स्थगिती उठवा नाहीतर खुर्च्या खाली करा', अशा घोषणा विरोधकांनी यावेळी दिल्यात.