Maharashtra Budget 2023 Live Updates: शेतकऱ्यांना मोठा दिलासा तर महिलांसाठी एसटी प्रवासात 50 टक्के सूट

Maharashtra Budget 2023 : राज्यात सध्या सुरु असणारी विकासकामं इथपासून ते अनेक महत्त्वाकांक्षी प्रकल्प आकारास आणण्यासोबतच राज्यातील नागरिकांचा विकास हा मुद्दा केंद्रस्थानी ठेवत यंदाचा अर्थसंकल्प सादर केला जात आहे. यातून तुम्हाला काय मिळणार? पाहा...   

Maharashtra Budget 2023 Live Updates: शेतकऱ्यांना मोठा दिलासा तर महिलांसाठी एसटी प्रवासात 50 टक्के सूट

Maharashtra Budget 2023 : शिंदे-फडणवीस सरकाराच पहिला अर्थसंकल्प अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस सादर करत आहेत.  सहा महिन्यांपूर्वी राज्यात एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली नवीन सरकार सत्तेत आलं. सत्तेत आल्यानंतर अनेक मोठे निर्णय सरकारकडून घेण्यात आले. त्यानंतर शिंदे-फडणवीस सरकारचा पहिला अर्थसंकल्प मांडला जात असून त्यामध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील शेतकरी आणि महिलांसाठी मोठ्या घोषणा केल्या आहेत.

 

 

9 Mar 2023, 15:25 वाजता

Maharashtra Budget 2023: अन्य विभागांसाठी आर्थिक तरतूद...
- गृह विभाग : 2187 कोटी रुपये
- महसूल विभाग : 434 कोटी रुपये
- वित्त विभाग : 190 कोटी रुपये
- सांस्कृतिक कार्य विभाग : 1085 कोटी रुपये
- मराठी भाषा विभाग : 65 कोटी रुपये
- विधी व न्याय विभाग : 694 कोटी रुपये
- माहिती तंत्रज्ञान व माहिती जनसंपर्क विभाग : 1342 कोटी रुपये
- महाराष्ट्र विधान मंडळ : 500 कोटी रुपये

 

9 Mar 2023, 15:22 वाजता

Maharashtra Budget 2023: चतुर्थ अमृत : रोजगारनिर्मिती,
सक्षम, कुशल-रोजगारक्षम युवा
विभागांसाठी तरतूद
- उद्योग विभाग : 934 कोटी
- वस्त्रोद्योग विभाग : 708 कोटी
- कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विकास विभाग : 738 कोटी रुपये
- शालेय शिक्षण विभाग : 2707 कोटी रुपये
- उच्च व तंत्रशिक्षण विभाग : 1920 कोटी रुपये
- वैद्यकीय शिक्षण व औषधीद्रव्ये विभाग : 2355 कोटी रुपये
- क्रीडा विभाग : 491 कोटी रुपये
- पर्यटन विभाग : 1805 कोटी रुपये
चतुर्थ अमृत एकूण : 11,658 कोटी रुपये

9 Mar 2023, 15:22 वाजता

Maharashtra Budget 2023: पंचम अमृत : पर्यावरणपूरक विकास
विभागांसाठी तरतूद
- वन विभाग : 2294 कोटी रुपये
- पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग : 224 कोटी रुपये
- उर्जा विभाग : 10,919 कोटी रुपये
पंचम अमृत एकूण : 13,437 कोटी रुपये

9 Mar 2023, 15:21 वाजता

Maharashtra Budget 2023: तृतीय अमृत : भरीव भांडवली गुंतवणुकीतून
पायाभूत सुविधा विकास
विभागांसाठी तरतूद
- सार्वजनिक बांधकाम विभाग : 19,491 कोटी रुपये
- ग्रामविकास व पंचायतराज विभाग : 8490 कोटी रुपये
- नियोजन व रोजगार हमी योजना विभाग : 10,297 कोटी रुपये
- नगरविकास विभाग : 9725 कोटी रुपये
- परिवहन, बंदरे विभाग : 3746 कोटी रुपये
- सामान्य प्रशासन विभाग : 1310 कोटी रुपये

9 Mar 2023, 15:13 वाजता

नाचू कीर्तनाचे रंगी...!
आम्ही सारे वारकरी...
 - संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत सोपानदेव, संत निवृत्तीनाथ, संत मुक्ताई निर्मलवारीसाठी : 20 कोटी
- कीर्तनकार, प्रवचनकार, निरुपणकार यांच्या समाजप्रबोधनाच्या कार्याचा सन्मान: श्री संत नामदेव महाराज कीर्तनकार सन्मान योजना

9 Mar 2023, 15:12 वाजता

Maharashtra Budget 2023: नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी, अपराधसिद्धतेत वाढीसाठी....
 - न्यायसहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळांचे बळकटीकरण
- न्यायवैद्यक विज्ञान महाविद्यालय स्थापन करणार
- 45 ठिकाणी अत्याधुनिक न्यायसहाय्यक मोबाईल युनिट
- मुंबईत सीसीटीव्ही टप्पा-2 राबविणार
- सायबर गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी सायबर सुरक्षा प्रकल्प
- राज्यात दोन नवीन कारागृह
- देवनार मानखुर्द येथे 500 क्षमतेचे बालसुधार गृह
- 12,793 कोतवालांचे मानधन सरसगट 15 हजार रुपये

 

9 Mar 2023, 15:11 वाजता

Maharashtra Budget 2023: झाडे झुडे जीव सोईरे पाषाण... पर्यावरणपूरक विकास
 - राज्याचे नेट झिरो उत्सर्जन साध्यतेसाठी उपाययोजना करणार
- 20,000 ग्रामपंचायतीत सौर उर्जा प्रकल्प
- भुसावळ येथे 500 किलोवॅटचा हरित हायड्रोजन प्रकल्प, सौर उर्जेचा वापर करणार
- जायकवाडी नाथसागर जलाशयात तरंगत्या सौरउर्जा पॅनेलद्वारे वीजनिर्मिती
- शैवाळ शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी अभ्यासगट
- हरित हायड्रोजन, हरित अमोनिया, सौर, पवन उर्जा क्षेत्रात 75,000 कोटींची गुंतवणूक अपेक्षित
- 15 वर्ष जुनी शासकीय वाहने निष्कासित करणार
- 8 ते 15 वर्षांत खाजगी वाहने निष्कासित केल्यास नवीन वाहनखरेदीसाठी कर सवलत
- एसटी महामंडळात 5150 इलेक्ट्रीक बसेस
- डिझेलवरील 5000 बसेस द्रवरुप नैसर्गिक वायू इंधनावर परावर्तित करणार
- पर्यावरण सेवा योजनेचा 7500 शाळांमध्ये विस्तार
- स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त 75 तलाव संवर्धनाचा कार्यक्रम
- प्रत्येक जिल्ह्यात धार्मिक व औषधी वृक्षांची अमृत वन उद्यानांची निर्मिती
- ग्रामीण भागात कडूनिंब, वड, उंबर, देशी आंबा, बेल असे पंचायतन
- धार्मिक स्थळाच्या परिसरात देवराई
- औषधी व व्यावसायिक वृक्षांच्या प्रजाती संवर्धनासाठी 50 हायटेक रोपवाटिका
- गोरेवाडा प्राणीसंग्रहालयात आफ्रिकन सफारी, पक्षी उद्यान यावर्षी
- शिवनेरी (जुन्नर) येथे बिबट सफारी

 

9 Mar 2023, 15:08 वाजता

Maharashtra Budget 2023: सक्षम, कुशल अन् रोजगारक्षम युवाशक्ती
- लॉजिस्टिक पार्क धोरण लवकरच
- नागपूर येथे 1000 एकरावर लॉजिस्टिक हब
- नागपूर, एमएमआर, पुणे, छत्रपती संभाजीनगर, नाशिक, रत्नागिरी असे 6 सर्क्युलर इकॉनॉमी पार्क
- वस्त्रोद्योग, खणिकर्म क्षेत्रासाठी नवीन धोरण
- स्टार्टअपसाठी कळंबोली, नवी मुंबई येथे निवासी प्रशिक्षण-संशोधन संस्था
- नवी मुंबईत जेम्स अँड ज्वेलरी पार्क, प्रयोगशाळानिर्मित हिर्‍यांच्या उद्योगाला चालना
- मांघर (महाबळेश्वर)च्या धर्तीवर ‘मधाचे गाव’ हा उपक्रम राज्यभर राबविणार
- 500 ग्रामपंचायतींमध्ये कौशल्य विकास कार्यक्रम, शहरांकडे ओढा थांबणार
- मुंबईतील 200 महापालिका, जि.प.शाळांमध्ये कौशल्य प्रशिक्षण
- 500 आयटीआयची दर्जावाढ/2307 कोटी रुपये
- 75 आयटीआयचे आधुनिकीकरण/610 कोटी रुपये
- 75,000 शासकीय नोकरभरतीचा महत्त्वाकांक्षी कार्यक्रम
- उद्योगांना आवश्यक मनुष्यबळासाठी 10 उत्कृष्टता केंद्रे स्थापन करणार

 

9 Mar 2023, 15:07 वाजता

Maharashtra Budget 2023: पर्यटनाला चालना...
- प्रत्येक जिल्ह्यातील 500 युवकांना जल, कृषी, कॅराव्हॅन, साहसी पर्यटन तसेच आदरातिथ्य क्षेत्राचे प्रशिक्षण
- पैठण येथील संत ज्ञानेश्वर उद्यानाचा नागपूर फुटाळा तलावाच्या धर्तीवर विकास
- 10 पर्यटन स्थळांवर टेंट सिटी उभारणार
- राज्याचा वार्षिक महोत्सव आराखडा तयार. यात शिवजन्मोत्सव शिवनेरी, भगवान बिरसा मुंडा महोत्सव, जव्हार, वीर बाल दिवस महोत्सव नांदेड इत्यादींचा समावेश

9 Mar 2023, 15:06 वाजता

Maharashtra Budget 2023: राज्यात 14 शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांची बांधकामे
 - राज्यात 14 ठिकाणी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांची बांधकामे करणार
- सातारा, अलिबाग, सिंधुदुर्ग, धाराशिव, परभणी, अमरावती, भंडारा, जळगाव, रत्नागिरी, गडचिरोली, वर्धा, बुलढाणा, पालघर, अंबरनाथ (ठाणे)
- मानसिक अस्वास्थ आणि व्यसनाधीनतेची वाढती समस्या पाहता जालना, भिवंडी, पुणे, नागपूर येथे नवीन व्यसनमुक्ती केंद्रे