Maharashtra Budget : राज्याच्या अर्थसंकल्पात शेतकरी कल्याणासाठी भरीव तरतूद
Maharashtra budget 2022 : राज्याच्या अर्थसंकल्पात शेतकरी कल्याणासाठी भरीव तरतूद करण्यात आली आहे.
मुंबई : Maharashtra budget 2022 : राज्याच्या अर्थसंकल्पात शेतकरी कल्याणासाठी भरीव तरतूद करण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार हे राज्याचा सन 2022-2023 चा अर्थसंकल्प आज सादर केला. यावेळी ही भरीव तरतूद जाहीर केली. (Maharashtra Budget: Substantial provision for farmers' welfare in the budget)
हिंगोलीत बाळासाहेब ठाकरे कृषी संशोधन केंद्र उभारणार येणार असल्याची घोषणा अजित पवार यांनी केली आहे. हिंगोलीमध्ये बाळासाहेब ठाकरे कृषी संशोधन केंद्र स्थापन करणार आहेत. हवेलीमध्ये संभाजीराजे यांचे स्मारक उभे करणार त्यासाठी 250 कोटी खर्च करण्यात येणार आहेत.
तसेचे नियमित कर्ज फेडणाऱ्यांना 50 हजार रुपये अनुदान देण्यात येणार आहे. महिला शेतकऱ्यांना अधिक अनुदान देणार आहे. शेतकऱ्यांसाठी 50 हजारांऐवजी 75 हजार अनुदान देण्यात येणार आहे. कोकण आणि परभणी कृषी विद्यापीठाला प्रत्येकी 50० कोटी निधी देण्यात आला आहे.
विकासाची पंचसूत्री करणार आहोत. जलसंपदा विभागासाठी 13 हजार 252 कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे. तसेच सहन आणि पणन विभागाला अधिक निधी देण्यात येणार आहे. अन्न प्रक्रिया योजना वाढवण्यात येणार आहेत. या वर्षात 60 हजार कृषी वीज पंपाना वीज देण्याची घोषणा अजित पवार यांनी केली. दोन वर्षात अपूर्ण सिंचन पूर्ण करणार असल्याचे त्यांनी जाहीर केले.