नागूपर : Maharashtra Zilla Parishads By-elections : राज्यातील सहा जिल्हा परिषदांमध्ये रिक्त झालेल्या 229 जागांसाठी आज पोटनिवडणूक होत आहे. या निवडणुकीची प्रशासनाकडून तयारी पूर्ण झाली असून सत्तेचं गणित बदलण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. भाजपला जागा वाढविण्याचे आव्हान आहे. तर काँग्रेसपुढे नव्याने सत्ता काबीज करण्याचे आव्हान आहे. त्यामुळे पोटनिवडणुकांवर जिल्हा परिषदेची सत्ता कोणाची ठरणार याची उत्सुकता आहे. (Maharashtra: By-elections for 229 seats in 6 Zilla Parishads today)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

6 जिल्हापरिषदा आणि पंचायत समित्यांमध्ये आज पोटनिवडणूक होत असल्याने काँग्रेस आणि भाजपमध्ये कोण बाजी मारणार याची उत्सुकता आहे. ओबीसींचे राजकीय आरक्षण रद्द झाल्याने सहा जिल्हापरिषदांमध्ये 229 जागा रिक्त झाल्या आहे. त्यासाठी पोटनिवडणूक होत आहे. या रिक्त जागा खुल्या प्रवर्गातून भरण्यात येणार आहेत.


पोटनिवडणुकांच्या निकालांवर नागपूर, अकोला आणि वाशीम जिल्हा परिषदांच्या सत्तेचे भवितव्य ठरणार आहे. तर  पालघरमधील निकालाने राजकीय चित्र बदलणार नाही.