Maharashtra Cabinet Expansion :  राज्यात यंदाच्या विधानसभा निवडणूकीत महायुतीला मोठं यश मिळालं. यात भाजपनं सर्वाधिक म्हणजे 132 जागा जिंकल्यात. त्यामुळे मंत्रिमंडळात भाजपचाच वरचष्मा पाहायला मिळाला..आज भाजपच्या तीन महिलांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. यात पंकजा मुंडे, मेघना बोर्डीकर आणि माधुरी मिसाळ यांचा समावेश आहे. तर गेल्यावेळीही मंत्रिपद भूषवलेल्या राष्ट्रवादीच्या आदिती तटकरे यांच्या गळ्यात पुन्हा मंत्रिपदाची माळ पडली.


पंकजा मुंडे


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पंकजा मुंडेंनी मंत्रिपदाची शपथ घेतल्याने गेल्या 5 वर्षांचा त्यांचा राजकीय वनवास संपल्याचं म्हंटलय जातंय...पंकजा मुंडे यांचा लोकसभेत पराभव झाल्यानंतर त्यांच्या पुनर्वसनाची मागणी होत होती. त्यामुळे 2014 नंतर पुन्हा एकदा  पंकजा मुंडेंनी दुसऱ्यांदा मंत्रिपदाची शपथ घेतली..त्यामुळे  मुंडे समर्थकांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. पंकजा मुंडे यांना दुस-यांदा मंत्रिपद मिळालेय.  2009, 2014 साली आमदार म्हणून निवडूण आल्या.  2014 मध्ये युती सरकामध्ये पंकजा मुंडेकडे महिला व बालविकास खात्याचा कारभार होता. 2019 च्या विधानसभेच्या निवडणुकीत पराभवाचा सामना करावा लागला. 2024 मध्ये लोकसभेत पराभूत झाल्यात. फडणवीसांच्या मंत्रिमंडळात पुन्हा स्थान मिळाले.


मेघना बोर्डिकर 


भाजपमधल्या मेघना बोर्डिकर यांनाही मंत्रिमंडळात स्थान देण्यात आलं. परभणीच्या जिंतूर विधानसभेच्या दोनदा आमदार असलेल्या बोर्डिकर यांना घरातूनच राजकीय वारसा मिळालाय. पाच वेळा आमदार असलेल्या वडिलांनतर त्यांनीही राजकीय वारसा सक्षमपणे सांभाळला. त्यांच्या रुपाने परभणी जिल्ह्याला 14 वर्षांनंतर मंत्रिपद मिळालं.


माधुरी मिसाळ


भाजपच्या माधुरी मिसाळ यांनीही पहिल्यांदाच मंत्रिपदाची शपथ घेतली. सलग चारवेळी आमदार होणाऱ्या त्या पश्चिम महाराष्ट्रातील पहिल्या महिला आमदार आहेत. विधानसभेच्या प्रतोद म्हणुनही त्यांनी काम पाहिलंय. 2007 साली कसबा मतदारसंघातून पहिल्यांदा नगरसेविका म्हणून निवडूण आल्या.  2009, 2014, 2019 आणि 2024 असे सलग चारवेळा आमदार.  आता देवेंद्र 3.0मध्ये राज्यमंत्रीपद मिळाले. 


आदिती तटकरे


तर राष्ट्रवादीच्या आमदार आदिती तटकरे या पुन्हा मंत्री झाल्यात. 2019 मध्ये पहिल्यांदाच श्रीवर्धन मतदारसंघातून आमदार झालेल्या आदिती तटकरे यांनी आमदारकीच्या पहिल्याच टर्ममध्ये मंत्रिमंडळात स्थान मिळालं होतं.  मंत्री आदिती तटकरे या 2017 ते 2019 रायगड जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा होत्या.  2019 ला पहिल्यांदा आमदार झाल्या.  मंत्रिमंडळात महिला व बालविकास खात्याची जबाबदारी त्यांच्याकडे होती.  2024 मध्ये दुस-यांदा आमदार  महायुतीच्या सरकारमध्ये पुन्हा मंत्रिपद मिळाले. 


विधानसभा निवडणुकीत महायुतीला प्रचंड बहुमत मिळालं. लाडकी बहीण योजना गेमचेंजर ठरली. लाडक्या बहिणींनी आम्हाला भरभरून मतं दिल्याचं महायुतीचे नेते सांगताहेत.  चार महिलांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. आता आगामी काळात त्यांना कोणतं खातं मिळणार याकडे लक्ष लागलंय