Maharashtra Cabinet Oath Ceremony: मंत्रिमंडळातून 11 माजी मंत्र्यांना डच्चू; पक्षांनी नाकारली संधी, कोण आहेत हे नेते?
भाजप , शिवसेना आणि राष्ट्रावादीनं जेष्ठ मंत्र्यांना डच्चू दिला आहे. तिन्ही पक्षांनी 11 माजी मंत्र्यांना पुन्हा संधी नाकारली आहे. तर नव्या चेहऱ्यांना मंत्रिमंडळात स्थान देण्यात आलं आहे. पाहुयात यावरील खास रिपोर्ट.
भाजप , शिवसेना आणि राष्ट्रावादीनं जेष्ठ मंत्र्यांना डच्चू दिला आहे. तिन्ही पक्षांनी 11 माजी मंत्र्यांना पुन्हा संधी नाकारली आहे. तर नव्या चेहऱ्यांना मंत्रिमंडळात स्थान देण्यात आलं आहे. पाहुयात यावरील खास रिपोर्ट.
फडणवीस सरकारमधील 39 मंत्र्यांचा शपथविधी पार पडला. या शपधविधीची वैशिष्य म्हणजे अनेक नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली तर जेष्ठ आणि काही जुन्या मंत्र्यांना डच्चू देण्यात आला आहे. तिन्ही पक्षाचे मिळून तब्बल 25 नव्या चेह-यांना मंत्रिमंडळात स्थान देण्यात आलं आहे.. तर 11 माजी मंत्र्यांना डच्चू देण्यात आला आहे. भाजपनं चार माजी मंत्र्यांना पुन्हा संधी दिली नाही आहे.
Maharashtra Cabinet Oath Ceremony: महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाचा अखेर विस्तार, 39 मंत्र्यांनी घेतली शपथ: वाचा संपूर्ण यादी
भाजपचे माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांना मंत्रिमंडळात स्थान मिळालं नाही आहे. तर भाजपचे विजयकुमार गावित यांनाही मंत्रिपद देण्यात आलेलं नाही. भाजपचे रविंद्र चव्हाण यांनाही मंत्रिपद नाकारण्यात आलं आहे. तर भाजपनं सुरेश खाडे यांनाही मंत्रिपद दिलं नाही.
शिवसेनेनं तीन जेष्ठ मंत्र्यांना पुन्हा मंत्रिपदाची संधी दिली नाही आहे. त्यात तानाजी सावंत, अब्दुल सत्तार, दीपक केसरकर यांचा समावेश आहे. तर राष्ट्रवादीनंही चार माजी मंत्र्यांना पुन्हा मंत्रीपद दिलं नाही. यात छगन भुजबळ, दिलीप वळसे-पाटील, अनिल पाटील, धर्मराव बाबा आत्राम, संजय बनसोडे यांना मंत्रिपद देण्यात आलं नाही.GFX OUT
तर फडणवीस मंत्रिमंडळात 25 नव्या चेहऱ्यांचा समावेश करण्यात आला आहे. यात पहिल्यांदा मंत्री होणा-या आमदारांची संख्या जास्त आहे.
नितेश राणे, भाजप
शिवेंद्रराजे भोसले, भाजप
अशोक उईके, भाजप
संजय सावकारे, भाजप
आकाश फुंडकर, भाजप
माधुरी मिसाळ, भाजप
मेघना बोर्डीकर, भाजप
पंकज भोयर, भाजप
माणिकराव कोकाटे, राष्ट्रवादी
नरहरी झिरवाळ, राष्ट्रवादी
मकरंद पाटील, राष्ट्रवादी
इंद्रनील नाईक,राष्ट्रवादी
बाबासाहेब पाटील, राष्ट्रवादी
संजय शिरसाट, शिवसेना
प्रताप सरनाईक, शिवसेना
भरत गोगावले, शिवसेना
आशिष जैस्वाल, शिवसेना
प्रकाश आबिटकर, शिवसेना
फडणवीस सरकारमधील 39 मंत्र्यांमध्ये 25 नवे चेहरे आहे. तर इतर ज्येष्ठ मंत्र्यांना पुन्हा संधी देण्यात आली आहे. त्यामुळे मंत्रिमंडळात जुने आणि नव्या चेह-यांचं समीकर साधण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.