मुंबई : मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात ईडीने अटक केलेले मंत्री नवाब मलिक ( MInister Nawab Malik ) यांनी अंतरिम दिलासा मिळण्यासाठी सुप्रीम कोर्टात ( Suprim Court ) धाव घेतलीय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राष्ट्रवादीचे मंत्री नवाब मलिक यांना ईडीने 23 फेब्रुवारी रोजी ताब्यात घेतले. त्यानंतर त्यांना कोर्टात हजर करण्यात आले असता मलिक यांनी आपणास बेकायदेशीररित्या अटक करण्यात आल्याचा आरोप करतानाच अंतरिम दिलासा मिळावा यासाठी अर्ज केला होता.


मुंबई उच्च न्यायालयाने मंत्री मलिक यांना अंतरिम दिलासा नाकारला. त्यामुळे नवाब मलिक यांनी आता सुप्रीम कोर्टाचे दरवाजे ठोठावले आहेत. मलिक यांनी विशेष रजा याचिका ( स्पेशल लिव्ह पिटीशन ) दाखल करत मुंबई हायकोर्टाच्या निर्णयाला सुप्रीम कोर्टात आव्हान दिलंय.


या याचिकेवर सोमवारी तातडीने सुनावणी घेण्यात यावी अशी मागणी या याचिका अर्जातून करण्यात आली आहे. ईडीने केलेली अटक बेकायदेशीर असून आपणास तात्काळ अंतरिम दिलासा मिळावा असा दावाही मलिक यांनी केला आहे.