संभाजीनगर : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी आज पैठणमध्ये जाहीर सभा घेतली. या सभेत त्यांनी अनेक मुद्द्यांवर ठाकरे गटाला (Thackeray Group) टोला लगावला. पण सर्वाधिक चर्चेत राहिला तो त्यांचा एक डायलॉग. त्यांनी म्हटलं की, एकदा शब्द दिला तर मी स्वत:चं देखील ऐकत नाही. सलमान खानचा (Salman Khan) हा डायलॉग मारल्यानंतर उपस्थितांनी ही देखील जल्लोष केला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बाळासाहेबांची खरी शिवसेना (Shivsena) कुठही याचं उत्तर आजच्या या सभेने दिली आहे. पैसे देऊन जमवलेली ही गर्दी नाही. प्रेमाने आलेली ही गर्दी आहे. ही सच्चा शिवसैनिकांची गर्दी आहे. आम्ही घेतलेल्या निर्णयाला पसंती देणारी ही गर्दी आहे. बाळासाहेब आणि आनंद दिघे यांनी एकच शिकवण दिली आहे. जे होणार असेल तेच बोला. मी दिलेला शब्द पाळतो आणि एकदा शब्द दिला की मी स्वत:चं ही ऐकत नाही. असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.


'जेव्हा अन्याय झाला, मुस्कट दाबी झाली. सत्तेतील इतर घटकपक्षाकडून जे जे झालं ते सगळ्यांना माहित आहे. तेव्हा इतर आमदार म्हणाले असं झालं तर पुढे काही खरं नाही. तेव्हा मला वाटलं भूमरे नाना बोलतील तसं धाडस करतील का? पण ते धाडसी निघाले.'


'आपला कार्यक्रम करण्याची तयारी झाली होती. पण 50 जण सगळ्यांना पुरुन उरले. आम्ही सत्तेतून पायउतार झालो. माझ्यासोबत अनेक मंत्री होते. 50 आमदारांनी निर्णय घेतला हा जगातील एक इतिहास आहे. तुमच्या ही मनात प्रश्न होता काय होईल.'


'2 वर्षात सर्व नकारात्मकता पसरली होती. मी आणि देवेंद्र जी यांनी निर्णय घेतला. सर्व सण धुमधडाक्यात होऊ द्यात. लोकांसाठी शिवसेना-भाजपचं सरकार स्थापन केलं. जिकडे तिकडे जातो तिकडे आतुरतेने वाट पाहत आहेत. सगळ्यांना वाटतंय हा आपल्यातला मुख्यमंत्री आहे. असं देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.