मुंबई : राज्यात आज कोरोनाचे 59,907 नवीन रुग्णांची वाढ झाली आहे. तर 30,296 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. राज्यात आज ३२२ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. त्यामुळे सध्या राज्यातील मृत्यूदर १.७९% वर पोहोचला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राज्यात आतापर्यंत एकूण 26,13,627 जणांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ८२.३६% एवढे झाले आहे. राज्यात सध्या 5,01,559 सक्रिय रुग्ण आहेत. 


सध्या राज्यात 25,78,530 व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत. तर 21,212 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. 


मुंबई : आज 10,428 नव्या कोरोना रुग्णांची वाढ झाली असून 23 जणांचा मृत्यू झाला आहे.


अमरावती : जिल्ह्यात आज दिवसभरात 4 रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला असून 344 रुग्णांची वाढ झाली आहे.


यवतमाळ : गेल्या 24 तासात जिल्ह्यात 8 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला असून 350 नवे कोरोना रुग्ण वाढले आहेत.


निफाड : तालुक्यात 229 नवे रुग्ण वाढले असून आतापर्यंत कोरोनामुळे एकूण 214 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.


भंडारा : जिल्ह्यात आज कोरोनाचे 1177 रूग्ण वाढले असून 9 जणांचा मृत्यू झाला आहे.


येवला :  आज 43 रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आला असून आतापर्यंत 82 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.


अकोला : गेल्या 24 तासात कोरोनाचे 263 रुग्ण वाढले असून 8 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.


जालना : जिल्ह्यात 24 तासात कोरोनाचे 614 नवे रुग्णांची नोंद झाली असून आज 6 जणांचा मृत्यू झाला आहे.


नांदेड : गेल्या 24 तासात 26 रुग्णांचा मृत्यू झाला असून 1255 नवे रुग्ण वाढले आहेत.


लातूर : जिल्ह्यात आज उच्चांकी 969 नवे कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झाली आहे. तर 2 जणांचा मृत्यू झाला आहे.


अहमदनगर : गेल्या 24 तासात 1652 कोरोना रुग्णांची भर पडली आहे.


नाशिक : जिल्ह्यात आज 4122 नव्या रुग्णांची वाढ झाली असून 24 जणांचा मृत्यू झाला आहे.


चंद्रपूर : गेल्या 24 तासात 637 नव्या रुग्णांची नोंद झाली असून 5 जणांचा मृत्यू झाला आहे.