मुंबई: महाराष्ट्रासाठी कोरोना काळातील सर्वात दिलासादायक बातमी समोर येत आहे. एकीकडे तिसऱ्या लाटेचा धोका आहे असं सांगितलं जात असताना आता राज्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या घटताना दिसत आहे. गेल्या महिन्यात पुन्हा एकदा कोरोग्रस्तांची उच्चांक गाठला होता. मात्र आता ही आकडेवारी कमी होत असल्याचं दिसत आहे. आज राज्यातील 7510 रुग्ण बरे होऊन घरी गेले. तर राज्यातील एकूण आतापर्यंत बरे झालेल्या रुग्णांची संख्या 60, 00, 911 आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नुकत्याच हाती आलेल्या कोरोनाच्या नव्या आकडेवारीनुसार राज्यात आज 6910 नवीन लोकांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. तर आज राज्यात 147 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. सध्या राज्यातील मृत्यू दर 2.09 टक्के एवढा आहे. तर कोरोनातून बरे होण्याचं प्रमाण 96.33 टक्के एवढं आहे. 


राज्यात सध्या 5,60, 354 व्यक्ती होम क्वारंटाइन आहेत. तर 3977 रुग्ण हे क्वारंटाइन सेंटरमध्ये उपचार घेत आहेत. राज्यात सध्या एकूण 94 हजार 593 अॅक्टीव्ह रुग्ण आहेत. ठाण्यात 1 हजारहून अधिक कोरोनाचे रुग्ण आज आढळले आहेत. नशिकमध्ये 700 तर पुण्यामध्ये 2468 रुग्ण आज आढळले आहेत. 


पश्चिम महाराष्ट्रात कोल्हापूर आणि पुण्यात सर्वात जास्त रुग्णसंख्या आज दिसली आहे. कोल्हापुरात आज 2272 कोरोनाग्रस्त रुग्णांची नोंद करण्यात आली. लातूरमध्ये 290 तर औरंगाबादमध्ये 78 रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. राज्यातील इतर भागांमध्ये कोरोनाचे रुग्ण कमी होत असल्याचं दिसत आहे. 


कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी लसीकरणात महाराष्ट्राने आज पुन्हा विक्रम केला आहे. राज्यात चार कोटींचा टप्पा पार केला. राज्यात आतापर्यंत 4 कोटी 24 हजार 701 लसींचे डोस देण्यात आले. आरोग्य विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. प्रदिप व्यास यांची माहिती दिली.