Maharashtra Politics : नागपूर अधिवेशनाच्या अखेरच्या दिवशी मुख्यमंत्री एकनात शिंदे यांनी (CM Eknath Shinde) पुन्हा एकदा उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि आदित्य ठाकरेंना (Aditya Thackeray) लक्ष्य केलं. कोरोना काळात मुंबईत मोठा भ्रष्टाचारा केल्याचा आरोप त्यांनी केला. तसंच टेंडर घोटाळ्यांना (Tender Scam) पेंग्विनपासून सुरूवात झाल्याचा दावा त्यांनी विधानसभेत केला.  भीतीच्या वातावरणात लोक जगच असताना पैसे लुटण्याचा प्रकार सुरु होता. कफनचोर, खिचडी चोर असा बिरुद देखील कमी पडतील असा भ्रष्टाचार झाला असल्याचा आरोप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला. ऑक्सिजन प्लांट मध्येही भ्रष्टाचार करण्यात आला. काही लोकांच्या कृपेने उत्तर प्रदेशमधल्या हाय वे कंस्ट्रक्शन कंपनीला कामं दिली असल्याचा गौप्यस्फोटही मुख्यमंत्र्यांनी केला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आदित्य राजाच्या कृपेने वरुन राजाच्या टेंडरचा पाऊस पडला आहे असा टोलाही मुख्यमंत्री शिंदे यांनी लगावला. या प्रकरणात रोमिन छेडा हा त्याचा प्यादा आहे. सुरुवातीला जिजामाता उद्यानातील पेंग्विन कक्षा पासून झाली. हायवे बांधनाऱ्या कंपनीला पेंग्विन कक्षाचे काम दिलं गेलं. पेंग्विन पाठोपाठ ऑक्सिजन प्लांट उभारण्याचे कामही देण्यात आल्याचं मुख्यमंत्री म्हणाले. कोव्हीड काळात काम पूर्ण केले नाही म्हणून 9 कोटी दंड करणं अपेक्षित पण 3 कोटी दंड वसूल केले गेले, नेमकी मेहरबानी का? असा सवाल मुख्यमंत्र्यांनी उपस्थित केला. 


पैशांसाठी लोकांच्या जीवाशी खेळायचं, थोडा तरी विचार करण्याची आवश्यकता होती 60 कोटींचं काम जुलैपर्यंत पूर्ण करणे अपेक्षित होते, ते ऑक्टोबर पर्यंत झालं. ऑगस्टपर्यंत काम पूर्ण न केल्याने 3 कोटींचा दंड ठोठावला. पण 9 कोटी दंड आकारणे अपेक्षित होतं. 
ऑगस्ट मध्ये बोगस कागदपत्रे दाखवत काम पूर्ण झाल्याचे दाखवलं. याच दाखल्याच्या आधारे 80 कोटींचे काम देण्यात आली. ज्या कथा आहेत, त्या अचंबित करणाऱ्या आहेत. रोबोटिक झू, प्रशासकीय कारवाई, लांडगे, कोल्हे, बिबट्या, तरस, पक्षाचे पिंजरे अशी सर्व कामे देण्यात आली. पेंग्विन कक्ष निगा आणि देखभालीसाठी काम देण्यात आली असे एकामागोमाग एक खुलासे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत केले.


रस्ते तयार करणारी रोमिंग छेडा कंपनीला किती वेगवेगळी काम दिली गेली हे तपासात बाहेर येईल असंही मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितलं. त्यांना फक्त पैशांशी मतलब आहे, जिथ टेंडर तिथ सरेंडर अशी त्यांची भूमिका होती. या कंपनीला नंतर महापालिका शाळांत वॉटर प्युरिफायर पुरवण्याचे काम देण्यात आलं. फिल्टर पंप, जुहू रुग्णालयात हाऊस कीपिंग कामं, बाळासाहेब ट्रॉमा रुग्णालयात काम, हे कमी की काय महापालिका रुग्णालयात एसीचं काम देण्यात आलं. ही कंपनी काय काय करते याची जंत्री फार मोठी आहे
हे वाचून माझं डोके गरगरायला लागलं आहे, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. पुढील चार वर्षांत या रोमिनला छोटी-मोठी मिळून सुमारे 270 कोटी रुपयांची तब्बल 57 कंत्राटं देण्यात आल्याचा गौप्यस्फोटही मुख्यमंत्र्यांनी केला.


ही लोक कुठल्या थराला गेले, याचा अंदाज येतोय. रोज तुम्ही आमच्यावर आरोप करणार, रोज शिव्या घालणार आता हे सर्व विथ प्रुफ बाहेर येणार असल्याचा इशारा मुख्यमंत्र्यांनी दिलाय. राज्यातील जनता मृत्यूशी लढा देत भीतीच्या वातावरणात जगत असताना पैसे लुटण्याचा हा किळसवाणा प्रकार पाहिल्यानंतर कुठल्याही सामान्य माणसाच्या मनात तिडिक उठल्याशिवाय राहाणार नाही


आदित्य ठाकरेंच्या मित्राची चौकशी
रेमडीसीवर इंजेक्शन घोटाळ्याप्रकरणी आदित्य ठाकरेंचा मित्र पुण्यशाली पारिखला चौकशीसाठी बोलावण्यात आलंय. आर्थिक गुन्हे शाखेनं पारिखला चौकशीसाठी हजर राहण्याबाबत समन्स पाठवलंय. कंत्राट देण्यासाठी महापौर बंगल्यावर बोलावण्यात आलं त्यावेळी पारिख तेथे उपस्थित होता. असं बीएमसी अधिका-यांनी चौकशी दरम्यान सांगितल्याची माहिती समोर येतेय...त्यानुसार पारिखला चौकशीसाठी बोलावण्यात आल्याचं समजतंय. मुख्यमंत्री शिंदेंनीही याच मुद्यावरून ठाकरेंचं नाव न घेता निशाणा साधलाय.