Dhule Crime News : धुळे स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने 24 तासाच्या आत उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) मजुराच्या हत्येचा छडा लावला आहे. धुळे शहरातील मध्यवर्ती भागात असलेल्या बारा पत्थर परिसरामध्ये उत्तर प्रदेशतील रहिवासी असलेल्या विजय कुमारचा खून झाला होता. या खून प्रकरणी धुळे स्थानिक गुन्हे शाखेने राहुल गौतम या आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत. राहुल गौतमला विजयकुमार याचा खून केल्याप्रकरणी धुळे पोलिसांनी पनवेल (panvel) येथून अटक केली आहे. मात्र चौकशीनंतर याप्रकरणात वेगळाच खुलासा झाला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

उधारीच्या पैशावरुन हत्या


आरोपी राहुल आणि मयत विजयकुमार हे दोघेही मित्र होते. भंगार बाजारात दोघे मजुरी करायचे. त्यांच्यात उसनवारीच्या पैशातून वाद झाला. त्यानंतर राहुलने विजयकुमारला मारहाण करत त्याचा खून केल्याचं पोलीस तपासात समोर आलं आहे. याप्रकरणी पोलिसांनी 24 तासांत तपास चक्र फिरवत आरोपी राहुलला पनवेल येथून अटक केली. चौकशीनंतर राहुलने विजयकुमारच्या हत्येची कबुली दिली आहे.


धुळ्यातील आरोपीला पनवेल येथून अटक


सुरुवातीला हे प्रकरण फक्त पैसे उसने घेतले म्हणून हत्या झाल्याचे वाटत होते. मात्र पोलीस तपासात अनेक धक्कादायक गोष्टी समोर आल्या आहेत. चाळीसगाव रोडवरील चौफुली परिसरात विजयकुमारचा मृतदेह आढळून आला होता. याप्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल केल्यानंतर पोलिसांनी तपास सुरु केला. तपासानंतर पोलिसांनी आरोपी राहुलला पनवेल येथून अटक केली आहे.


सीसीटीव्हीतून पटली आरोपीची ओळख


उत्तर प्रदेशातील विजयकुमार धुळ्यातील भंगार बाजार परिसरात हमालीचे काम करत होता. त्याचा हत्येनंतर पोलिसांनी चाळीसगाव रोड चौफुली भागातील सीसीटीव्ही फुटेज तपासले. या फुटेजमध्ये एक व्यक्ती संशयितरित्या बसमध्ये बसत असताना दिसून आला. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारावर तपास करत पोलिसांनी राहुलला अटक केली आहे.


एकाच महिलेसोबत संबध आणि...


दरम्यान, हत्येच्या दिवशी विजयकुमार आणि आरोपी राहुल हे अमळनेर येथे गेले होते. त्यावेळी त्यांनी तिथे एकाच महिलेसोबत संबध ठेवले. त्यानंतर दोघांनी मद्यपान केले. यावेळी दोघांमध्ये पैसे उसने घेतल्याच्या कारणावरुन वाद झाला. या वादाचे रुपांतर हाणामारीत झाले. मारहाणीनंतर राहुलने विजयकुमार सोबत अनैसर्गिक कृत्य देखील केल्याची माहिती समोर आली. जबर मारहाणीनंतर राहुल तिथून निघून गेला. मात्र विजयकुमारचा मारहाणीत तिथेच मृत्यू झाला. यानंतर पोलिसांनी राहुलला पनवले येथून अटक केली आहे.