सागर आव्हाड, झी मीडिया, पुणे : पुण्यातून आताची एक मोठी बातमी समोर येत आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नावाने पुण्यातील एका बड्या बिल्डरला खंडणीसाठी धमकी देण्यात आल्याचं प्रकरण उघड झालं आहे. अजित पवार यांच्या मोबाईल क्रमांकाचा वापर करुन या बिल्डलकडे २० लाख रुपयांची खंडणी मागण्यात आली होती.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नेमकं प्रकरण काय?
अॅपच्या सहाय्याने आरोपींनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नावाने बिल्डरला फोन केला. अजित पवार यांचा पीए  चौबे बोलत असल्याचं सांगून आरोपींनी या बिल्डरकडे २० लाख रुपयांची खंडणी मागितली. याप्रकरणी बिल्डरने तात्काळ पुण्यातील बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. 


हा प्रकार १३ जानेवरीपर्यंत सुरु होता. आरोपींनी बिल्डरकडून २ लाख रुपयेही उकळले होते. या प्रकरणाची गंभीर दखल घेत पोलिसांनी तपास करत ६ आरोपींना अटक केली आहे. धक्कादायक म्हणजे एका अॅपद्वारे आरोपींनी खुद्द अजित पवार यांच्याच मोबाईल क्रमांकाचा वापर केला होता. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.