राज्यात सध्या भाजपा, एकनाथ शिंदेंचा शिवसेना गट आणि अजित पवारांचा राष्ट्रवादी गट असं तीन पक्षांचं सरकार आहे. एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी पक्षांतर्गत बंड पुकारल्यानंतर राज्य सरकारला पाठिंबा दर्शवला. एकनाथ शिंदेंच्या मदतीने राज्यात सरकार स्थापन झाल्यानंतर त्यांच्याकडे मुख्यमंत्रीपद सोपवण्यात आलं होतं. तर अजित पवार सत्तेत सहभागी झाल्यानंतर त्यांच्याकडे उपमुख्यमंत्रीपद देण्यात आलं. दरम्यान, अजित पवार शरद पवारांची साथ सोडून सत्तेत सहभागी का झाले? यासंबंधी वेगवेगळे अंदाज लावले जात आहेत. त्यातच गेल्या काही दिवसांपासून अजित पवार नाराज असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. यादरम्यान, देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवार सत्तेत सहभागी होण्यामागील कारणाचा खुलासा केला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भाजपाने अजित पवारांशी हातमिळवणी का केली? असं विचारण्यात आलं असता देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं की, "आज सर्वच विरोधी पक्ष पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधात एकत्र येत आहेत. नरेंद्र मोदी हे एकमेव त्यांचं लक्ष्य आहे," असं देवेंद्र फडणवीस यांनी इंडिया टुडेच्या कार्यक्रमात बोलताना सांगितलं. "जर एखाद्या पक्षाला आम्हाला मजबूत करण्यासाठी सोबत यायचं असेल, तर त्यात अडचण असण्याचं काही कारण नाही," असं ते म्हणाले.


भाजपाने अजित पवारांशी हातमिळवणी का केली? असं विचारण्यात आलं असता देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं की, "आज सर्वच विरोधी पक्ष पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधात एकत्र येत आहेत. नरेंद्र मोदी हे एकमेव त्यांचं लक्ष्य आहे," असं देवेंद्र फडणवीस यांनी इंडिया टुडेच्या कार्यक्रमात बोलताना सांगितलं. "जर एखाद्या पक्षाला आम्हाला मजबूत करण्यासाठी सोबत यायचं असेल, तर त्यात अडचण असण्याचं काही कारण नाही," असं ते म्हणाले.


सरकारला मजबूत करण्यासाठी अजित पवार भाजपात सामील झाले असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आहे. "एकनाथ शिंदे हेदेखील याच कारणासाठी सहभागी झाले," असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. जून महिन्यात अजित पवार यांनी बंड पुकारलं आणि शरद पवारांची साथ सोडली. यानंतर त्यांनी भाजपाला पाठिंबा जाहीर केला. त्याआधी एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंड पुकारत भाजपाला पाठिंबा जाहीर केला होता. 


गेल्या काही दिवसांपासून अजित पवार सरकारमध्ये नाराज असल्याची चर्चा रंगली आहे. यादरम्यानच देवेंद्र फडणवीस यांनी हा खुलासा केला आहे. काही राजकीय तज्ज्ञांच्या मते, अजित पवार सत्ता मिळवण्यासाठी भाजपाचा वापर करत असून, ते भविष्यात पुन्हा बाहेर पडू शकतात. 


राष्ट्रवादीसह सध्या वाद सुरु असल्याच्या चर्चांवर भाष्य करताना ते म्हणाले की "अजित पवार आमच्यासोबत असल्याने नाराज नाही, तर आनंदी आहोत. मी माझ्या कार्यकर्त्यांना ओळखतो. त्यांच्याबद्दल चिंता करु नका. आम्ही याआधी अजित पवार आणि राष्ट्रवादीशी लढा दिला आहे. पण जेव्हा तुम्ही संपलेले असता, तेव्हा जगण्याची कृती करावी लागते".


देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी इंडियाचा उल्लेख करताना कशाप्रकारे 27 विरोधी पक्ष भाजपाविरोधात एकत्र आले आहेत हे सांगितलं. याआधी हेच विरोधी पक्ष एकमेकांच्या जीवावर उठले होते, पण एका गरजेपोटी एकत्र आले आहेत असं म्हणाले.


त्याचप्रमाणे अजित पवार हे आमचे राजकीय सहकारी असल्याचं फडणवीसांनी सांगितलं आहे. "शिवसेना आमचा नैसर्गिक मित्रपक्ष आहे. राष्ट्रवादी राजकीय मित्र असून, नैसर्गिक युती नाही. जर पुढील 5 ते 10 वर्षं आमच्यासह राहिले तर ते नैसर्गिक मित्र ठरतील. ते नक्कीत आमच्यासह राहतील," असा विश्वास देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे.