जिल्हा बँक निवडणूक : भाजपला मोठा झटका तर महाविकास आघाडीचे वर्चस्व
District Central Co-operative Bank Election: राज्यात जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅक निवडणुकीत भाजपला (BJP) मोठा झटका बसला आहे. तर महाविकास आघाडीला मोठे (Maharashtra Vikas Aghadi ) यश मिळाले आहे.
मुंबई : District Central Co-operative Bank Election: राज्यात जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅक निवडणुकीत भाजपला (BJP) मोठा झटका बसला आहे. तर महाविकास आघाडीला मोठे (Maharashtra Vikas Aghadi ) यश मिळाले आहे.
भाजपच्या राणे पॅनेलला मोठा धक्का
कोकणातील रत्नागिरी जिल्हा बँक निवडणुकीत भाजपच्या राणे पॅनेलला मोठा धक्का बसला आहे. केवळ दोन जागाच जिंकता आल्यात. तर सिंधुदुर्गचे पालकमंत्री उदय सामंत यांनी आपले वर्चस्व कायम राखले आहे. सरकार पॅनेलचा या निवडणुकीत विजय झालाय. नंदुरबारमध्ये भाजपला धक्का बसला आहे. तर जळगावमध्ये एकनाथ खडसे गटाने भाजपचे गिरीश महाजन गटाला जोरदार दणका दिला आहे. तर लातूरमध्ये काँग्रेस पॅनेलने वर्चस्व कायम राखले आहे. (Maharashtra : District Central Co-operative Bank Election: Maharashtra Vikas Aghadi dominates while BJP loses)
रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत सातपैकी पाच जागा सर्वपक्षीय सहकार पॅनेलने जिंकल्या आहेत. काही जागा बिनविरोध झाल्या होत्या. सहकार पॅनेलने राणे पॅनेलचा धुव्वा उडवला आहे. 21 पैकी 19 जागा जिंकून सहकार पॅनेलने आपले वर्चस्व कायम राखले आहे. लांजा मतदार संघात सहकार पॅनेलला पराभव पत्करावा लागला. याठिकाणी राणे गटाचा सदस्य निवडून आला.
देशमुख सहकारी पॅनलचे निर्विवाद वर्चस्व
लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅकेवर माजी मंत्री दिलीपराव देशमुख सहकारी पॅनलचे निर्विवाद वर्चस्व कायम राहीले आहे. संचालक मंडळाच्या एकूण 19 जागांपैकी 10 जागांवर काँग्रेसच्या पॅनलचे उमेदवार बिनविरोध निवडून आले तर 9 जागांसाठी झालेल्या मतदानातही काँग्रेसच्याच 8 जागा निवडून आल्या.
धुळे आणि नंदुरबारमध्ये सर्वपक्षीय पॅनेलची सत्ता
धुळे आणि नंदुरबार जिल्हा बँकेत सर्वपक्षीय पॅनेलने पुन्हा एकदा सत्ता काबीज केली आहे. 17 जागांपैकी 7 जागा बिनविरोध झाल्या होत्या. दहा जागांवर निवडणूक झाली. यात भाजपचे प्राबल्य असलेल्या पॅनलने वर्चस्व मिळवले. आमदार अमरिश पटेल, जयकुमार रावल, कुणाल पाटील यांच्या पॅनलला बहुमत मिळाले आहे.
10 जागांपैकी तीन जागांवर किसान संघर्ष पॅनलच्या उमेदवारांनी विजय मिळवला तर, सात जागांवर सर्वपक्षीय शेतकरी विकास पॅनल विजयी झाले. सर्वपक्षीय शेतकरी विकास पॅनलच्या विरोधात लढणारे शिवसेना नेते माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी आणि माजी आमदार शरद पाटील यांना होती. मात्र, या दोघांनी दिलेल्या किसान संघर्ष पॅनलला केवळ चार जागांवर विजय मिळाला. या चार जागांमध्ये चंद्रकांत रघुवंशी आणि शरद पाटील स्वतः विजयी झालेत.
धक्कादायक निकाल
या निवडणुकीत भाजप खासदार डॉ. सुभाष भामरे यांचे भाऊ सुरेश पाटील हे पराभूत झाले आहेत. सुरेश पाटील यांना शरद पाटील यांनी धोबीपछाड दिली आहे. विशेष म्हणजे पाटील हे सर्वाधिक जागा जिंकणाऱ्या सर्वपक्षीय शेतकरी विकास पॅनलचे उमेदार होते.
जळगाव जिल्हा बँक : धक्कादायक निकाल
उत्तर महाराष्ट्रातील राजकीयदृष्ट्या महत्त्वाची असलेल्या जळगाव जिल्हा बँकेच्या निवडणुकीत काही धक्कादायक निकाल लागले आहेत. महाविकास आघाडीच्या सहकार पॅनेलचे एकूण 20 उमेदवार विजयी झाले आहेत तर एका मतदार संघात अपक्ष उमेदवार भाजप आमदार संजय सावकारे विजयी झाले आहेत.
रावेरात धक्कादायक निकाल लागला असून महाविकास आघाडीच्या सहकार पॅनेलच्या जनाबाई गोंडु महाजन एक मताने विजयी झाल्या आहेत. सहकार पॅनेलच्या जनाबाई गोंडु महाजन यांनी विरोधी उमेदवार अरुण पाटील यांना जाहीर पाठिंबा दिला होता. तर, एकनाथ खडसे यांच्या कन्या रोहिणी खडसे याचा देखील विजय झाला आहे. जिल्हा बँक निवडणुकीत महाविकास आघाडीने भाजपला धक्का दिला आहे. 21 जागांपैकी 11 जागा राष्ट्रवादी काँग्रेस, 7 जागांवर शिवसेना, 2 जागांवर काँग्रेस आणि एका जागेवर भाजप उमेदवार विजयी झाला.