पुणे : प्रश्नपत्रिकेतील चुकलेला प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केलेल्या विद्यार्थ्यांना चक्क ७ मार्कांची लॉटरी लागलीय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राज्य माध्यमिक व उच्च शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेबाबत हा प्रकार घडला आहे. बारावी विज्ञान शाखेतील रसायन शास्त्राचा पेपर २८ फेब्रुवारीला झाला. त्यातील दोन प्रश्नांमध्ये चुका झाल्याची बाब समोर आलीय. 


प्रश्नात चुका असताना तो सोडवण्याचा प्रयत्न केलेल्या विद्यार्थ्यांना सरसकट ७ गुण बहाल करण्याचा निर्णय राज्य परीक्षा मंडळानं घेतलाय. यावर्षी विज्ञान शाखेतून राज्यातील ५ लाख ८० हजार ८२० विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी किती विद्यार्थी या बोनस गुणांसाठी पात्र ठरतात हे निकालातूनच कळेल. 


दरम्यान तज्ज्ञ शिक्षकांकडून प्रश्नपत्रिका तयार करूनही अशा चुका का राहतात असा प्रश्न यानिमित्तानं उपस्थित झालाय.