मुंबई : नांदेड-वाघाळा महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. यासोबतच मुंबई, पुणे, नागपूर आणि कोल्हापूर मनपाच्या पोट निवडणुकही पार पडणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नांदेड-वाघाला महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीकरिता प्रत्यक्ष निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. या निवडणुकीची आचारसंहिता आजपासूनच लागू झाली असून ही आचारसंहीता निवडणुकीचा निकाल जाहीर होईपर्यंत अंमलात राहील.


नांदेड मनपाची मुदत ३१ ऑक्टोबर रोजी संपत आहे. त्यापूर्वी निवडणूक घेणं बंधनकारक आहे. एक नजर टाकूयात महत्वाच्या तारखांवर...


नामनिर्देशनपत्र दाखल करण्याची तारीख - १६ सप्टेंबर ते २३ सप्टेंबर २०१७


नामनिर्देशनपत्रांची छाननी - २५ सप्टेंबर २०१७ (सकाळी ११ वाजल्यापासून)


उमेदवारी मागे घेण्याचा अंतिम दिनांक - २७ सप्टेंबर २०१७ (दुपारी ३ वाजेपर्यंत)


निवडणूक लढविणा-या उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्याचा दिनांक - २८ सप्टेंबर २०१७


मतदानाचा दिनांक - ११ ऑक्टोबर (सकाळी ७.३० ते संध्याकाळी ५.३० वाजेपर्यंत)


मतमोजणीचा दिनांक - १२ ऑक्टोबर (सकाळी १० वाजल्यापासून)