Gram Panchayat Election : शिंदे गटाची मोठी कसोटी; राज्यातील 7751 ग्रामपंचायत निवडणुकांचे बिगुल वाजले, पाहा कार्यक्रम
Gram Panchayat Election: राज्यात निवडणुकांचे वारे सुरु झालेत. आता राज्यातील 7751 ग्रामपंचायत निवडणुकांचे बिगुल वाजले आहे. (Maharashtra Political News) निवडणूक आयोगाने निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे.
Maharashtra Gram Panchayat Election: राज्यात निवडणुकांचे वारे सुरु झालेत. आता राज्यातील 7751 ग्रामपंचायत निवडणुकांचे बिगुल वाजले आहे. (Maharashtra Political News) निवडणूक आयोगाने निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. आता शिंदे गटाची खरी मोठी कसोटी असणार आहे. दरम्यान, मुंबईतील अंधेरी विधानसभा पोटनिवडणुकीत शिंदे गटाने आपला उमेदवार दिला नव्हता. तर भाजपने शिवसेना (उद्धव ठाकरे) विरोधातील आपला उमेदवार मागे घेतला होता. या निवडणुकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने चांगले यश मिळवले. आता ग्रामपंचायत निवडणुकीत ठाकरे गटाची कशी कामगिरी राहते याकडे लक्ष आहे.
राज्य निवडणूक आयोगानं राज्यातील ऑक्टोबर 2022 ते डिसेंबर 2022मध्ये मुदत संपणाऱ्या सुमारे ७७५१ ग्रामपंचायतीच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला आहे. राज्यातील 7751 गावांमध्ये निवडणुकीची रणधुमाळी असणार आहे. 18 नोव्हेंबरला संबंधित तालुक्यातील तहसीलदार निवडणुकीची नोटीस जारी करतील. 18 डिसेंबरला मतदान होणार आहे. तर 20 डिसेंबरला निकाल जाहीर होणार आहे.
ग्रामपंचायत निवडणुक कार्यक्रम जाहीर झाल्याने आचारसंहिता लागू होणार आहे. राज्य निवडणूक आयोगानं जारी केलेल्या आदेशानुसार 18 नोव्हेंबरला निवडणुकीची नोटीस जारी होईल. त्यामुळे निकाल जाहीर होईपर्यंत 7751 गावांमध्ये आचारसंहिता लागू असेल. त्यामुळे मोठी घोषणा, राजकीय लाभ मिळेळ अशी घोषणा खासदार, आमदार, संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पदाधिकाऱ्यांना करता येणार नाही. असे कोणी केले तर आचारसंहितेचं उल्लंघन ठरणार आहे.
डिसेंबर 2022 पर्यंत कालावधी संपलेल्या तसंच नव्यानं स्थापन झालेल्या ग्रामपंचायतींची निवडणूक होणार आहे. या निवडणुकीचा कार्यक्रम आयोगाने जाहीर केला आहे.
निवडणुकीचा कार्यक्रम
तहसिलदरा निवडणुकीची नोटीस प्रसिद्ध करणार : 18 नोव्हेंबर
अर्ज दाखल करण्याची मुदत : 28 नोव्हेंबर ते 2 डिसेंबर
अर्ज छाननी : 5 डिसेंबर
अर्ज मागं घेण्याचा दिनांक : 7 डिसेंबर
निवडणूक चिन्ह वाटप : 7 डिसेंबर दुपारी 3 नंतर
मतदानाची तारीख : 18 डिसेंबर
मतमोजणी आणि निकाल : 20 डिसेंबर
निकालाची अधिसूचना : 23 डिसेंबर