मुंबई : Maharashtra Engineering Admissions 2021 :  इंजिनिअरिंग विद्यार्थ्यासाठी मोठी बातमी. आता इंजिनिअरिंग विद्यार्थ्यांना प्रवेश घेता येणार आहे. मात्र, त्यासाठी मुदत असणार आहे.   एमएचटी सीईटी परीक्षांचे निकाल (MHT CET Exam Results) जाहीर झाल्यानंतर प्रवेश प्रक्रियेची प्रतीक्षा संपुष्ठात आली आहे. इंजिनिअरिंग प्रवेशाची (Engineering Admission) प्रक्रिया सुरू झाली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

इंजिनिअरिंगसाठी ऑनलाइन प्रवेश अर्जाची मुदत 18 नोव्हेंबरपर्यंत आहे. अभियांत्रिकी पदवी (बीई) (Admissions in Maharashtra 2021) प्रवेशाचे संभाव्य वेळापत्रक (Time table) जाहीर झाले आहे. शैक्षणिक वर्ष 2021-22 साठी ही प्रवेशप्रक्रिया राबवली जात आहे. सीईटीचा निकाल जाहीर झाल्यानंतर विद्यार्थ्यांना पुढील प्रक्रियेची प्रतीक्षा होती.


इंजिनिअरिंग विद्यार्थ्यासाठीचे सीईटी सेलने वेळापत्रक प्रसिद्ध केले असून त्यानुसार सीईटी दिलेल्यांना ऑनलाइन नोंदणी आणि आवश्यक कागदपत्रे अपलोड करण्यास 18 नोव्हेंबरच्या सायंकाळी 5 पर्यंत मुदत आहे. 27 नोव्हेंबरला अंतिम गुणवत्ता यादी जाहीर होणार आहे.  नंतर कॅप राऊंड सुरू होणार आहे.


कागदपत्रे अपलोडनंतर ई-स्क्रूटिनी आणि सुविधा केंद्रावर जाऊन कागदपत्रांच्या पडताळणीसाठी स्क्रूटिनीची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.  


प्रवेशाचं वेळापत्रक असे असेल


– ऑनलाइन अर्ज आणि कागदपत्र अपलोड : 18 नोव्हेंबरपर्यंत
– कागदपत्रे पडताळणी प्रक्रिया : 20 नोव्हेंबरपर्यंत
– प्रारूप गुणवत्ता यादीची प्रसिद्धी : 22 नोव्हेंबर
– यादीशी निगडित तक्रार, हरकती नोंदवणे : 23 ते 25 नोव्हें.
– अंतिम गुणवत्ता यादी : 27 नोव्हेंबर
– पहिल्या कॅप राऊंडसाठी नोंदणीची प्रक्रिया : 27 ते 30 नोव्हेंबर
– पहिली वाटप यादी : 2 डिसेंबर
– प्रवेश निश्चितीची मुदत : 3 ते 5 डिसेंबर 


 महाविद्यालय कधी सुरू होणार?


सीईटी सेलच्या वेळापत्रकानुसार प्रवेशप्रक्रिया 23 डिसेंबरपर्यंत चालणार आहे. त्याआधी 6 डिसेंबरपासून महाविद्यालयांतर्फे अध्ययन प्रक्रिया सुरू केली जाऊ शकते, अशी माहिती सीईटी सेलने दिली आहे. त्यानंतर प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही, याची खबरदारी घेण्याच्या सूचना देखील देण्यात आल्या आहेत.