Ajit Pawar on Maharashtra Goverment : महायुतीतील तिन्ही नेते देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी आज राज्यपालांची भेट घेऊन सत्तास्थापनेचा दावा केला. त्यानंतर राज्यपालांनी गुरुवारी 5 डिसेंबरला संध्याकाळी 5.30 वाजता शपथविधी घेण्याची परवानगी दिली. राज्यपालांच्या भेटीनंतर महायुतीच्या तिन्ही नेत्यांनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत अजित पवार यांनी दिल्लीवारीसंदर्भात मोठा खुलासा केला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

महायुतीच्या सत्तास्थापनेला गेल्या काही दिवसांपासून विलंब होत असल्याने महायुतीत काही आलबेल नाही अशी चर्चा रंगली होती. एकनाथ शिंदे यांची तब्येत खराब असल्याने ते आराम करत होते. तर अजित पवार केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या भेटीसाठी दिल्लीत दोन दिवस मुक्काम केला होता. आपल्या पदरात जास्त आणि महत्त्वाची खाती पडावी या मागणी ते दिल्लीत दोन दिवस तळ ठोकून होते. 


'अमित शाहांच्या भेटीसाठी...'


मात्र अजित पवार यांनी पत्रकार परिषदेतून दिल्लीवारीसंदर्भात खुलासा केलाय. ते म्हणाले की, मी माझ्या वेगळ्या कामाच्या निमित्त दिल्लीला गेलो होतो. मी कोणाला भेटायला गेलो नव्हतो. मस्त चॅनलवाल्यांनी दादा अमित शाहांना कधी भेटणार आज कि उद्या, अशा बातम्या दाखवल्या. मी जर भेटायलाच गेलो नव्हतो, तर मग अमित शाहांनी भेट नाकारण्याचा विषय येतोच कुठे?


यावेळी अजित पवार यांनी एक महत्त्वाची बातमी सांगितलं. ते म्हणाले की, या सगळ्यांनी माझी पत्नी सुनेत्रा पवार यांची राज्यसभेवर नियुक्ती केली आहे. त्यांना 11 जनपथ इथे बंगला मिळाला आहे. माझं घर असू द्या किंवा सरकारचं घर, मला ते नीटनीटकं लागतं, हे सगळ्यांना माहितीये. म्हणून मी तिथे आर्किटेक्टला घेऊन काय नियमामध्ये गोष्टी करता येतील, ते पाहण्यासाठी गेलो होतो. 


त्यासोबत प्रफुल्ल पटेल आणि माझ्यावर ज्या काही खटले सुरु आहेत. त्याबद्दल मी कधी वकिलांना भेटलो नव्हतो. दिल्लीतील सर्व जबाबदारी प्रफुल्ल पटेल पार पाडत असतात. काल (3 डिसेंबर) ला पक्षाचा चिन्हाची तारीख होती, ती पुढे ढकली होती. तो विषय एकदा सपवावा. आमचा सुप्रीम कोर्टात प्रकरण सुरु आहे. सुप्रीम कोर्ट सर्वांची बाजू ऐकून योग्य निर्णय देईल. पण इथल्या कामामुळे मला कधीच वकिलांना भेटता आलं नाही. त्यांनाही भेटणं अतिशय महत्त्वाचं होतं. म्हणून मी दिल्लीला गेलो होतो. तसंच जवळच्या नातेवाईकाचं लग्न होतं. या तीन गोष्टींकरीता मी दिल्लीला गेलो होतो, असं अजित पवार म्हणाले.