मुंबई : राज्य सरकारकडून अनलॉक-४ ची नियमावली जाहीर करण्यात आली आहे. अनलॉक-४मध्ये जिल्ह्याबाहेर प्रवासासाठी असेला ई-पास रद्द करण्यात आला आहे. तसंच राज्यातला लॉकडाऊन ३० सप्टेंबरपर्यंत वाढवण्यात आला आहे. असं असलं तरी मिशन बिगिन अगेनच्या अंतगर्त काही गोष्टी सुरू करायला परावनगी देण्यात आली आहे. वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी धार्मिक स्थळं उघडण्याबाबत आज पंढरपूरमध्ये आंदोलन केलं, पण अनलॉक-४ मध्ये धार्मिक स्थळं उघडण्याला परवानगी देण्यात आलेली नाही.


२ सप्टेंबरपासून काय सुरू होणार?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

- हॉटेल आणि लॉज पूर्णपणे सुरू करायला परवानगी, पण त्यासाठीची नवी नियमावली दिली जाणार


- खासगी तसंच मिनी बसना परवानगी 


- खासगी ऑफिस ३० टक्के कर्मचारी संख्येवर काम करु शकतील


- प्रवासी आणि मालाच्या आंतरराज्य प्रवासासाठी ई-पासची गरज नाही


या गोष्टी बंदच राहणार 


- शाळा-कॉलेज ३० सप्टेंबरपर्यंत बंदच राहणार 


- आंतरराष्ट्रीय विमान प्रवासाला बंदी, केंद्रीय गृहमंत्रालयाने परवानगी दिली असेल तरच आंतरराष्ट्रीय प्रवास करता येणार


- मेट्रो आणि रेल्वे बंदच राहणार


- सिनेमागृह, स्विमिंग पूल, एन्टरटेन्मेंट पार्क, थिएटर, मॉल, मार्केट कॉम्प्लेक्स, बार, ऑडिटोरियम, सभागृह यांच्यासारखी ठिकाण बंद राहणार 


- सामाजिक, राजकीय, क्रीडा, मनोरंजन, शैक्षणिक, सांस्कृतिक, धार्मिक कार्यक्रम आणि मोठ्या कार्यक्रमांवर बंदी कायम